
धाराशिव पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही १ कोटी चे वर गांजा केला जप्त,चालकासह तिघांना घेतले ताब्यात…
अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन,५२८ किलो गांजा केला जप्त स्थानिक गुन्हे शाखा व नळदुर्ग पोलिसांची संयुक्तिक कारवाई….


धाराशिव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक गौहर हसन, उपविभाग पोलिस अधिकारी तुळजापूर निलेश देशमुख यांचे आदेशाने दि.30.07.2024 रोजी कोल्हापुर जिल्ह्यात घडलेल्या जातीय घटनेच्या अनुषंगाने नळदुर्ग बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, नापोशि ढगारे, पोशि कोळी, आशमोड,चापोशि भोसले व पोलिस ठाणे नळदुर्गचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, परि. पोउपनि नांगरे, सफौ गायकवाड, पोशि फुलसुंदर, जाधव, कुंभार,जाधव, शिंदे चापोशि सगर असे पेट्रोलिंग करत असताना पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक पांढऱ्या रंगाची स्कार्पीओ क्र एमएच 08 झेड 5684 मध्ये गांजाची वाहतुक होणार आहे

अशा खात्रीशीर माहीतीवरुन पथकाने नळदुर्ग बसस्थानक ते सोलापूर कडे जाणारे रोडवर राजेबाग शहावली दर्गाच्या विरुध्द बाजूस पेट्रोलिंग करत असताना पथकास एक पांढऱ्या रंगाची स्कार्पीओ क्र एमएच 08 झेड 5684 ही संशयास्पदरित्या जाताना दिसली त्यावर पथकाने सदर स्कार्पीओला थांबवून नमुद गाडी मध्ये एक इसम मिळून आला. त्यास पथकाने त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव -अतिष राजकुमार माने, वय 38 वर्षे, रा. हाऊसे वस्ती अमराई जुना देगाव नाका सोलापूर असे सागिंतले. तसेच त्यास गाडी मध्ये काय आहे. असे विचारले असता त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हनुन पथकाने सदर वाहनाची तपासनी केली असता त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा ज्याचे एकुण वजन 528.94 किंलो त्याची एकुण किंमत 1, 05,78,800 ₹, स्कार्पीओ गाडी 10,00,000₹, मोबाईल 5,000₹ किंमतीचा असा एकुण मुद्देमाल किंमत 1, 15, 83, 800 ₹ मिळून आला आहे.

यातील आरोपी अतिष राजकुमार माने, वय 38 वर्षे, रा. हाऊसे वस्ती अमराई जुना देगाव नाका सोलापूर त्यास वरील मुद्देमालासह ताब्यात घेवून पोलिस स्टेशन नळदुर्ग येथे गुरनं 294/2024 कलम 20 (ब), 8 (क), 29 एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास अधिक विचारपुस केली असता सदर गांजा हा विशाखापट्टणम येथुन आणला असुन तो सोलापुर येथे नेत असल्याचे सांगितले तसेच त्याची अधिक चौकशी केली असता त्त्याने त्साचे साथीदारांची नावे सांगितली लागलीच तपासी अधिकारी सपोनि आनंद कांगुने यांनी सोलापुर गाठुन यातील त्याचे साथीदार 1) प्रथमेश गोरे 2)रविराज काडगे दोन्ही रा सोलापुर तसेच 3) राहुल हिवाळे रा श्रीरामपुर जि अहमदनगर यास त्याची चारचाकी सुजुकी स्विफ्ट क्र MH-16DC0455 सह ताब्यात घेतले परंतु यातील दोन मुख्य आरोपी यांना चाहुल लागतात ते फरार झाले पुढील तपासात खुप काही खुलासा होईल की हा माल कोणाचा व कोणी पाठवला याचा पुढील तपास सपोनि आनंद कांगुने करीत आहेत
सदरची कामगीरी ही पोलिस अधिक्षक. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक गौहर हसन,उपविभागीय पोलिस अधिकारी, तुळजापूर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक. वासुदेव मोरे, पोलिस ठाणे नळदुर्गचे प्रभारी अधिकारी- गजेंद्र सरोदे, परि. पोउपनि, नांगरे, सफौ गायकवाड, नापोशि ढगारे, पोशि कोळी, आशमोड,चापोशि भोसले व पोलिस ठाणे नळदुर्गचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, परि. पोउपनि नांगरे, सफौ गायकवाड, पोशि फुलसुंदर, जाधव, कुंभार,जाधव, शिंदे चापोशि सगर यांनी केली


