तुळजाभवानी दागिणे चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

आई तुळजाभवानी दागिने चोरी प्रकरणी महंतांसह 7 जणांवर गुन्हे दाखल; विशेष तपास पथकाची नियुक्ती….

धाराशिव (प्रतिनिधी) – आई तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे अलंकार चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने 4 महंतासह 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.







सोन्या चांदीच्या दागिन्याचा गैर व्यवहार प्रकरणी पोलिस ठाणे तुळजापूर येथे गुरनं ५१९/२०२३ कलम ४२०,४०६,४०९,३८१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोमनाथ बबुराव माळी, (वय ४०) व्यवसाय.- तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर ता.तुळजापूर जि.धाराशिव रा. शासकीय निवास्थान, पापनाश रोड, एस.टी. कॉलनी जवळ तुळजापूर यांच्या तक्रारीवरुन आरोपी नं- १) महंत हमरोजी बुवा गुरु चिलोजी बुवा, २) महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, ३) महंत वाकाजी बुवा गरु तुकोजी बुवा, ४) महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा, ५) अंबादास भोसले-सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक (मयत), ६) दर्जवारी रजिस्टर नुसार सेवेदारी पंलगे, सोबत अनोळखी इतर सर्व रा. तुळजापूर जि.धाराशिव यांनी दि. ०१.०१.१९६३ रोजी ००.०० ते दि. १९.१२.२०२३ रोजी २२.०० वा.सु. श्री. तुळजाभवानी मंदीरातील नमुद वर्णनाचे श्री. देवीजींचे मौल्यवान दागीने, अलंकार, वस्तु, सोने, चांदीच्या वस्तु नमुद केलेल्या कालावधीत ज्या व्यक्तींकडे त्यांचा ताबा व जबाबदारी होती त्यांनी श्री. तुळजाभवानी देवीजींचे मौल्यवान अलंकार व वस्तु, सोने, चांदीच्या, वस्तु, त्यांच्याकडे विश्वासाने ताब्यात दिलेल्या असताना त्यांनी त्या विश्वासाचा भंग करुन सदर वस्तुंचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केलेला आहे, त्या चोरुन नेलेल्या आहेत व त्यांचा वापर स्वतःची वस्तु म्हणून करुन श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान व भाविकांची दिशाभुल करीत सदरची मालमत्ता लुबाडुन फसवणुक केलेली आहे.



जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्या आदेशावरून दागिने चोरी प्रकरणात महंत हमरोजी बुवा, गुरू चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत बजाजी बुवा, सहायक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे, मंदिरातील अज्ञात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या प्रकरणी एक विशेष तपास समिती स्थापन केली असुन सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक प्रमुख उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख, तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक चास्कर, महिला पोलिस उप निरीक्षक जाधव हे करत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!