देहव्यापार करणाऱ्या लॅाजवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

 अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. चार महिलांची सुटका, दलालासह लॉजचालक व मॅनेजर विरुध्द गुन्हा दाखल 
स्थानिक गुन्हे शाखा  पोलिस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही….

धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस निरीक्षक  वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. २१.१२.२०२३ रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर ०४.०५ वा. सुमारास छापा टाकला असता लॉज मध्ये चार महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने त्यांची महीला पोलिसांमार्फत विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे, वय ६३ वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय २९ वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, हे दोघेजण नमुद लॉजचे मालक १ ) नितीन रोहीदास शेरखाने रा. धाराशिव यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना आर्थिक
प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका चालवित आहेत असे समजले. यावरुन पथकाने लॉज मॅनेजर





१) दिलीप रामदास आडसुळे, वय ६३ वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल-२) बालाजी चंद्रकांत गवळी, वय २९ वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, अॅटोरिक्षा क्र एमएच ०९ ८१३४, रोख रक्कम १६, १३० व निरोधची पाकीटे असा एकुण ७१,१३० ₹ माल हस्तगत केला.पोलिसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन (लॉजमालक) १) नितीन  रोहीदास शेरखाने रा. धाराशिव, लॉज मॅनेजर -२) दिलीप रामदास आडसुळे, वय ६३ वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल- ३) बालाजी चंद्रकांत गवळी, वय २९ वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं ३५२/२०२३ भा.दं.वि. सं. कलम ३७०, ३७० (अ) (२), ३४ सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५ अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. २१.१२.२०२३ रोजी गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अपर पोलीस अधिक्षक गौहर  हसन यांच्या आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  वासुदेव मोरे, पोलिस
हवा  अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, शोभा बांगर, शैला टेळे,पोलिस शिपाई- साईनाथ आशमोड, योगेश कोळी, रंजना होळकर, चालक पोलिस अमंलदार भोसले, अरब यांच्या पथकाने केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!