महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारा धाराशिव पोलिसांच्या ताब्यात..
नळदुर्ग(धाराशिव) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली दि.२२.१०.२०२३ रोजी १०.०० नळदुर्ग पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी लोखंडे यांचे आदेशाने नळदुर्ग पो ठाण्याचे
पथक नळदुर्ग पो ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास बातमी मिळाली की, गंधोरा गावाचे हद्दीत नळदुर्ग तुळजापूर रोडवर सह्याद्री हॉटेल समोर एका वाहना मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटख्याची वाहतुक होतेय अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन नळदुर्ग पो ठाणेचे पथकाने सदर ठिकाणी जावून नमुद वाहन क्र एमएच ४४ यु २४०५ छोटा दोस्त गाडी हे चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. यातील आरोपी नामे-
१) जावेद जब्बार मोमीन, वय ३६ वर्षे, रा. बार्शी नाका इमीमपुररोड बीड ता.जि. बीड,
२) कट्टू नजिर शेख, वय ४५ वर्षे, रा. बार्शी नाका इमीमपुररोड बीड ता.जि. बीड,
याचे ताब्यात नमुद वाहनात हिरा पान मसाला एकुण २१ पोते, तंबाखु १० पोते मिळून आले. अंदाजे ३,९७,२०० ₹ किंमतीचा माला
सह छोटा दोस्त वाहन अंदाजे २,००,०००₹ किंमतीचा असा एकुण ५,९७,२००₹ किंमतीचा माल मिळून आल्याने जप्त करुन मिळून आलेले दोन आरोपी नामे- १) जावेद जब्बार मोमीन, वय ३६ वर्षे, रा. बार्शी नाका इमीमपुररोड बीड ता.जि. बीड, २) कट्टू नजिर शेख, वय ४५ वर्षे, रा. बार्शी नाका इमीमपुररोड बीड ता.जि. बीड यांचे विरुध्द
पोलिस ठाणे नळदुर्ग येथे गुरनं ४९३ / २०२३ भा.द.वि. सं. कलम ३२८, २७२, २७३, ३४ सह अन्न व सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६ (२), (आयव्हि), ३१(१)(z) ५९ (I), (ई), ३०(२) (I) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उप निरीक्षक झराड करत आहे.
सदर कामगिरी ही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी बरकते, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी लोखंडे, पोलिस अमंलदार १८९७/एन बी शिंदे पोलिस ठाणे नळदुर्ग यांचे पथकाने केली.