
धाराशिव पोलिसांनी केला अवैध गुटखा निर्मिती कारखाना उध्वस्त….
उमरगा- (धाराशिव)– सवीस्तर व्रुत्त असे की दि. १५.०९.२०२३ रोजी गुप्त बातमीदारामर्फत माहिती मिळाली की, रिलायन्स पेटोलपंप, चौरस्ता उमरगा चे पाठीमागील शेतशिवारात बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये अवैधरित्या गुटखा तयार
करून साठा करून विक्री व्यवसाय करत आहेत अशी माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहितीची खात्री करून नमुद ठिकाणची पाहणी करून त्याबाबत वरीष्ठांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी बरकते पोलिस निरीक्षक पारेकर, सपोनि कासार, मपोउपनि माने, पो.ह घोळसगाव, बोईने, मारेकर, गायकवाड, खतीब, पोना सय्यद, कावळे, राउत, कांबळे पोशि उंबरे, मुळे, मते, भोरे, सगर, सोनटक्के, बिराजदार व दोन पंच असे मिळून वर नमुद ठिकाणी छापा मारून सदर ठिकाणावरून गुटखा तयार करणारे ०९ मिक्सर मशिन, गुटखा तयार करण्यासाठी लागणारे सुपारी, जर्दा, कात, सुगंधी तंबाखू
व तयार पॅकींग केलेला गोवा गुटखा माल व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन टाटा टेम्पो ट्रक एम एच १३ सीयु ५१२६ असा एकूण ४८, ४५, ५०० रू चा मुददेमाल मिळून आलेने जप्त करून मिळून आलेला एका आरोपीविरुदध पो स्टे उमरगा गुरनं ३२८,१८८, २७२, २७३ भादंवि सह कलम ५९,२६ (२) (आय),२६(२) (४), २७ (३) (इ), ३०(२) अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी हि मा. पो लीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत
यांचे मार्गदर्शनाखाली वरील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी विशेष कामगिरी बजावली आहे.


