पिंपळनेर पोलिसांनी पकडला शहरात येणारा गुटखा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पिंपळनेर पोलिसांची कारवाई; १ लाख ८० हजारांचा तंबाखु-सुगंधीत गुटखा जप्त…

धुळे (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणून पिंपळनेर पोलिसांचे पथक हे कारवाईसाठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी सापळा लावून वाहतूक होत असलेला अवैध पानमसाला, तंबाखु – गुटखा असा जवळपास १.८०.७७८/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०४फेब्रुवारी) रोजी सहायक पोलिस निरिक्षक जयेश खलाणे, पिंपळनेर पोलिस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, कुडाशी गावा कडुन एक ट्रक क्र.एम.एच. १४ बी.जे. ०३२८ टाटा ट्रक या वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेली सुंगधीत तंबाखु व पान मसाला गुटखा भरुन पिंपळनेर गावा कडे येत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन सपोनि जयेश खलाणे यांनी लागलीच शासकीय वाहनावर रात्रगस्तीसाठी असलेले बी.आर. पिंपळे चालक पोशि पंकज वाघ यांना मार्गदर्शन करुन आदेशीत केल्याने कारवाईत सदर वाहन हे पिंपळनेर ते कुडाशी रोड लगत मराठा दरबार हॉटेल जवळ रोडवर रात्री २४:०० वा.सुमारास कडुन त्यावरील चालकास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मुक्तार अहमद मुंजर अहमद (वय ४२ वर्षे) रा.मालेगांव, किल्ला जवळ जि.नाशिक, असे सांगितले व सोबत असलेल्या इसमास नाव-पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अफजल अहमद मोहमद शफिक (वय ३२) रा. मालेगाव आझादनगर जि.नाशिक असे सांगितले त्यांना वाहनात काय आहे या बाबत विचारले असता त्यांनी वाहनात पेपरसाठी लागणारा माल मटेरियल असल्याचे सांगितले. पंरतु सदर वाहनात सुगंधीत तंबाखु व पानमसाला असल्याचा संशय आल्याने सदर वाहनाची ताडपत्री बाजु करुन पाहणी करुन खात्री केली त्यात खाकी, व पांढ-या रंगाच्या गोण्यामध्ये सुगंधी तंबाखु व पानमसाला आढळुन आल्याने सदर वाहन पोलीस ठाण्यात आणले व दोन पंचासमक्ष पंचनामा केला असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखु मिळुन आली आहे.



१) १.८०.७७८/- रुपये किंमतीचा विमल केसर युक्त पान मसाला, बोलो जुबा केसरी, वि-१ तंबाखु गुटखा असा माल मिळुन आला.



२) १०,००,०००/-रुपये किंमतीचे एक टाटा कंपनीचे ट्रक वाहन क्रमाक. एम. एच. १४ बी.जे. ०३२८ जुना वापरता

असा एकुण ११.८०.७७८/- (एकरा लाख ऐशी हजार सातशे अठयाहतर रुपये किंमतीचा माल वाहनासह विक्रीसाठी वाहतुक करतांना मिळुन आल्याने सदर मुद्देमाल व वाहन पुढील कारवाईसाठी जप्त करण्यात आले आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपुर विभाग सचिन हिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, ग्रामीण विभाग साक्री साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, अमीत माळी, बापु पिंपळे, पंकज वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!