शिरपुर पोलिसांनी पकडला १२ लक्ष रु चा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखु…
शिरपुर पोलिसांनी पकडला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुंगधित तंबाखू…
शिरपुर(धुळे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 30/01/2024 रोजी पोलिस निरिक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, सेंधवा कडुन शिरपुर कडे एक ट्रक क्र. DL 01 GC 5154 या वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू भरुन महाराष्ट्र राज्यात पुरवठा करण्यासाठी वाहतुक करीत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी लागलीच पोहवा संदिप ठाकरे, चालक पोहवा संतोष पाटील,पोशि योगेश मोरे, स्वप्नील बांगर, संजय भोई अशांना सदर वाहनाची खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेशित करुन सदर वाहन हे हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे दि. 30/01/2024 रोजी सकाळी 06.30 वा चे सुमारास पकडून वाहनावरील चालक व क्लिनर यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव चालक
1) सद्दाम मुनीजर वय 32 वर्षे, व्यवसाय चालक, क्लीनर
2)मो. बिलाल फजरखान, वय- 27 वर्षे, दोन्ही रा. फिरोजपुर मेयो ता. पुनहाना जि. नुहु राज्य हरियाणा
असे सांगुन त्यास वाहनात काय आहे बाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे सदर वाहनात तंबाखू सदृश पदार्थ असल्याचा संशय असल्याने सदर वाहन पोलिस ठाण्यात आणून दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन त्यात खालील प्रमाणे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू मिळुन आली त्याचे वर्णन खालील प्रमाणे.
1) 4,70.400/- रुपये किंमतीची आराधना छाप नावाची सुगंधित तंबाखू,
2) 3,96,800/- रुपये किंमतीची प्रिमीयम रत्ना छाप नावाची सुगंधित तंबाखू,
3) 15,00,000/- किंमतीचा एक 10 चाकी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक
त्याचा R.T.O. पासिंग क्रमांक DL 01 GC 5154 एकुण- 23,67,200/-
सदर मुद्देमाल व वाहन जप्त केले असुन पुढील कारवाई शिरपुर पोलिस करीत आहे.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे.उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपुर सचिन हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक श्रीराम
पवार,सफौ रफिक मुल्ला, पोहवा संदिप ठाकरे, चालक पोहवा संतोष पाटील, पोशि योगेश मोरे, स्वप्नील बांगर, संजय भोई, कृष्णा पावरा यांनी केलेली आहे.
३