
मध्यप्रदेशातुन अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणारा शिरपुर तालुका पोलिसांच्या ताब्यात…
मध्यप्रदेशातुन दारुची चोरटी वाहतुक करणां-याच्या शिरपुर तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या….
शिरपुर(धुळे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दिनांक 29/02/2024 रोजी सकाळी 10.20 वा चे सुमारास पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, वरला मध्यप्रदेश राज्यातुन आंबा ते खंबाळे गावाकडे एक महिंद्रा मॅक्स कंपनीची गाडी क्रमांक एम.एच.29 J-0261 हिचेत अवैध बियर ची वाहतुक होत आहे. या बातमी वरुन पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी आंबा ते खंबाळे रस्त्यावर नाकाबंदी लावुन कारवाई करणे बाबत आदेशित केले. आंबा ते खंबाळे रस्त्यावर नाकाबंदी करुन वरला कडुन येणारे वाहन चेक करीत असतांना बातमीत मिळालेले वाहन क्रमांक एम.एच.29 J-026 हे येतांना दिसले तेव्हा वाहन चालक यास नांव गांव विचारला असता राम बाबु भिल वय 55 वर्षे रा.पळासनेर ता. शिरपुर जि. धुळे
असे सांगितले. त्यास सदर वाहनात काय माल आहे या बाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने सदर
वाहन पोलिस ठाणे येथे आणुन वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता Mounts 600 बियर चे पत्रटी टिन चे 70 बॉक्स मिळुन
आले आहे. Mounts 600 बियर चे 70 बॉक्स मधील पत्रटी टिन ची एकुण किंमत 1,83,120 रुपये व महिंद्रा मॅक्स वाहनाची किंमत 3,50,000/- रुपये किंमतीची असे एकुण 5,33,120/- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आलेला आहे.
सदर कारवाई श्रीकांत धिवरे पोलिस अधीक्षक, धुळे किशोर काळे, अपर पोलिस अधीक्षक, धुळे,.एस ऋषीकेश रेडडी, अतिरिक्त पदभार SDPO शिरपुर विभाग शिरपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम पवार,सफौ कैलास जाधव,चापोहवा बिपीन येवलेकर,पोशि नेरकर,शिवाजी वसावे,कृष्णा पावरा, यांनी केली




