शस्त्रनिशी दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी शिरपुर तालुका पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

मुंबई-आग्रा महामार्गावर पळसनेर घाटात काही  संशईत ईसम संदीग्ध अवस्थेत फिरताय अशा गोपनीय माहीती वरुन शिरपुर तालुका पोलिस त्या ठिकाणावर जाऊन त्यांची चौकशी केली असता ते शस्त्रानिशी दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असलेले दरोडेखोर शिरपुर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले…





शिरपुर(धुळे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.८ रोजी दुपारी १२.३५ वा. सुमारास शिरपुर तालुका पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,पळासनेर घाटात काही संशयीत ईसम वाहनात फिरत असल्याची गोपनिय  बातमी मिळाली होती. त्यावरुन पोलिस निरीक्षक श्रीराम पवार पोलिस स्टाफसह मुंबई आग्रा माहामार्गावर पळासनेर घाटात गेले असता पळासनेर शिवारातील भिलाट बाबा मंदिराच्या पुढे नाल्याजवळ वाहन क्र. आर. जे. ४५ यु.ए. ५००७ हे मिळुन आले त्यातील ईसम न (१) महाविरसिंग विजयसिंग रावत वय १९ वर्षे, रा. राजवा ता. भिम जि. राजेसमन राज्य-राजस्थान,



(२) महिंदर मोहनलाल जाट वय २८ वर्षे रा. खाया न्यु. ता. सोजद जि. पाली राज्य-राजस्थान, ह.मु.आलुर मेनरोड माटलीता. दासनरपुर जि. होबली, राज्य – बँगलोर,



(३) विनोदकुमार सुजाराम जाट वय ३० वर्षे रा. खाऱ्या न्यु. ता. सोजद जि. पाली राज्य-राजस्थान, ह.मु. आलुर मेनरोड माटली ता. दासनरपुर जि. होबली,राज्य- बँगलोर,

(४) हेमेंदरसिंग सैतानसिंग वय २२ वर्षे रा. भिलोका भाडीया ता. मसुदा जि. अजमेर राज्य-राजस्थान, यांना ताब्यात घेतले असुन

(५) दिवाराम शंकरलाल जाट रा. खाऱ्या न्यु. ता. सोजद जि. पाली राज्य-राजस्थान,

(६) रामसिंग बाटी रा. भोपालगड जि. जोतपुर राज्य राजस्थान,

अ.क्र. ०५ व ६ हे पळुन गेले आहेत.
सदर वाहनात व मिळुन आलेले अ.क्र. ०१ ते ०४ यांचे अंगझडतीत दरोडा टाकण्यासाठी पुर्वतयारीचे साहित्य महिंद्रा कंपनीची एक्स.यु.व्ही. ५०० या वाहनासह, २ गावठी कट्टे, ३ जिवंत काडतुस, चाकु, लोखंडी टामी, मिरची पावडर, कटर, दोरखंड, इत्यादी ९,०९,६००/- रुपये किमतीचे साहित्य मुद्देमाल मिळुन आला आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे,अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर सचिन हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलिस ठाण्याचे पोनि. श्रीराम पवार, सफौ रफिक मुल्ला,जयराज शिंदे,पोहवा शेखर बागुल,संदिप ठाकरे,नापोशि दिनेश  सोनवणे ,पोशि वाला पुरोहीत, मुकेश पावरा,ग्यानसिंग पावरा,दिनकर पवार, मनोज नेरकर,भुषण पाटील,चापोशि मनोज पाटील यांनी केली असुन पोहवा  शेखर बागुल यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरुन शिरपुर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढिल तपास पोउपनि कृष्णा पाटील हे करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!