
धुळे पोलिसांच्या स्पेशल ड्राईव्ह दरम्यान स्थागुशा पथकाने पकडला १७ लक्ष रु चा दारुसाठा….
आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने धुळे पोलिसांनी जिल्हयात राबविलेल्या स्पेशल ड्राईव्ह दरम्यान अवैधरित्या लाखो रूपयाच्या दारूची वाहतूक करणारा आयचर ट्रक स्थानिक गुन्हे शाखा, धुळेच्या पथकाने पकडला….
धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, धुळे यांनी धुळे जिल्हयात आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने स्पेशल ड्राइव्ह घेवून अवेध धंद्यांवर कायदेशिर कार्यवाही करण्याकरिता निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथके तयार करून धुळे जिल्हयातील स्पेशल ड्राईव्हचे सत्र सुरु आहे. या दरम्यान दिनांक 18 /03/2024 रोजीच्या रात्री पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त बातमी मी मिळाली की, एक आशयर वाहनात लाखो रूपयाची अवैध दारू शिरपुरच्या दिशेने जात आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा यांनी लागलीच त्यांचा पथकास या बाबत माहिती कळवून बातमीतील आशयर वाहनाचा शोध घेवून त्यांवर कारवाई
करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार धुळे शहराबाहेरील नगाव शिवारात धुळे कडून सोगीरच्या दिशेने एक स्विफ्ट कार स्विफ्ट
कार क्र. एमएच 47/बी.एल 2967 व तिच्या सोबत एक आशयर वाहन क्र एमएच 05 / ए. एम 7176 दिसून आले मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर वाहनांचा संशय आल्याने सदर आयशर वाहन थांबवून त्यांतील चालकांना त्यांचे नाव गाव विचारता स्विफ्ट
मधील चालकाने त्याचे नाव


1) प्रदृम्न जितनारायण यादव वय 25 रा. गांधीनगर, कांदीवली पश्चिम नुराणी मशिद जवळ,मुंबई

2) विरेंद्र कल्पनाथ मिश्रा वय 35 रा. कामनरोड, रजत अपार्टमेंट, पहिला मजला रूम नं. 301 गणेश मंदीराजवळ, वसई जि. पालघर तसेच आयशर मधील चालकाने त्याचे नाव

3) श्रीराम सुधाकर पारडे वय 32 रा. सुचकनाका नेतेवली कल्याण शिळरोड दुबे किराणा स्टोअर्स, मुकादम चाळ समोर, कल्याण पुर्व 4) राकेश रामस्वरूप वर्मा बय-60 रा. सविना खेडा माताजी मंदीर जवळ, उदयपुर जि. उदयपुर राजस्थान
असे सांगीलते. त्यांचे वर्तन व हालचाली संशयास्पद वाटत असल्याने सदर इसमांसह वाहन ताब्यात घेवुन ते पोलिस अधीक्षक कार्यालय धुळे येथे आणुन पंचासमक्ष खात्री करुन, सदर आयशर वाहना मध्ये सिमेंटच्या पत्र्यांच्या खाली
1)रॉयल ब्यु कंपनीच्या 180 मी.ली च्या विस्कीच्या 48 बॉटल्सचा एक बॉक्स प्रमाणे एकुण 320 बॉक्स. कि.16,89,600/-
2) एक आयशर ट्रक क्र एमएच 05/ए.एम 7176. कि. 13,00000/-
3)एक स्विफ्ट कार क्र. एमएच 47 बी.एल 2967 कि.7.00000/-
.असा एकूण 36,89,600/- रू चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्यापथकाने हस्तगत केला असून आरोपीताविरूध्द पश्चिम देवपूर पोलिस स्टेशन येथे मुबंई दारुबंदी तसेच मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास देवपुर पोलिस करीत आहेत
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनात व अधिपत्याखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोउनि बाळासाहेब सूर्यवंशी, पोउनि, अमरजित मोरे,पोहवा पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, चाकल पोशि राजेंद्र गिते सर्व नेमनुक स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांनी केली


