
गुंगीकारक औषधाची विक्री करतांना स्थानिक गुन्हे शाखेने एकास घेतले ताब्यात…
विना परवाना गुंगीकारक औषधाची विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….
धुळे (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत.पोलिस अधिक्ष श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, यांचे निर्देशानुसार स्था.गु.शा.चे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध धंदे, अवैध गुटखा साठवण, वाहतूक व विक्री, धाबे व हॉटेलवर देशी विदेशी दारुविक्री, जुगार यांचेवर विशेष पथकाद्वारे गोपनीय माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. म्हणून त्या अनुषंगाने स्था.गु.शा.चे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी त्यांच्या पथकाला मार्गदर्शक सुचना देऊन अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यास सांगितले. तेव्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांचे पथक कारवाईसाठी गस्तीस असताना त्यांना चाहूल लागली की, विना परवाना गुंगीकारक औषधाच्या बाटल्या आणि गोळ्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने एक इसम फिरत आहे. या मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने त्याला अटक करून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०९जुन) रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अजय राजु कोठारी रा.नंदुरबार हा त्याच्या ताब्यात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवुन आणणा-या गुंगीकारक औषधाच्या बाटल्या बाळगुन त्याची चोरटी विक्री करण्यासाठी धुळे शहरात बस स्थानक जवळील टॅक्सी स्टॅण्ड परिसरात आलेला आहे अशा बातमीच्या त्या अनुषंगाने पोउनि.प्रकाश पाटील व अमित माळी यांनी पथकासह मोराणे येथील हॉटेल महेंद्र च्या परिसरात शोध घेत असता, धुळे शहरात बस स्थानक जवळील टॅक्सी स्टॅण्ड परिसरात एक इसम संशयास्पद रित्या हालचाल करत असतांना दिसल्याने त्याच्यावर संशय बळावल्याने त्याचे वर संध्या ७.४० वा.सु. जागीच छापा टाकुन त्यास पकडले. त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव अजय राजु कोठारी (वय ३३) रा.नंदुरबार असे असल्याचे सांगीतले. त्याच्या कब्ज्यात खालील वर्णन व किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला तो पुढीलप्रमाणे

१) एका खाकी बॉक्समध्ये ट्रायप्रोलिडाईन हायड्रोक्लोराइड आणि कोडीन फॉस्फेट सिरप (१.२ मिग्रॅ + १० मिग्रॅ) कोडेक्टस टीआर कफ सिरप १०० मिली च्या एकुण १०० सिलंबद बाटल्या असे एकुण १३,५५०/- रु. किमतीचे साहित्य हे जप्त केले आहे.

२) एका खाकी बॉक्स मध्ये Alprazolam Tablets IP ०.५ ज्यांची किं.४५.७०/- प्रमाणे यांचे एकुण ५ बॉक्स पैकी एका बॉक्स मध्ये एकुण ७५० गोळया असे एकुण ५ बॉक्स मध्ये ३७५० गोळया एका स्क्रीप ची किंमत ४५.७० असे एकुण ११४२५/- रु. किंमतीचे साहित्य जप्त केले आहे. वरील प्रमाणे मुद्येमाल मिळुन आला असुन त्याच्या विरुध्द धुळे शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक,किशोर काळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा.चे पोलिस निरीक्षक. श्रीराम पवार, पोउपनि अमित माळी,पोउपनि प्रकाश पाटील,सफौ संजय पाटील,पोहवा हेमंत बोरसे, मच्छींद्र पाटील, प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, रविंद्र माळी, सुरेश भालेराव, प्रकाश सोनार, चापोहवा कैलास महाजन यांनी केली आहे.


