धुळे स्थानिक गुन्हे शाखेचा शहरातील गुटखा विक्रेत्याला दणका…
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडुन जप्त…
धुळे(प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण तसेच लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने धुळे जिल्हा सध्या सतर्क मोडवर असल्याचे लक्षात येते कारण दिवसानिहाय होणार्या धडाकेबाज कार्यवाया त्याचाच एक भाग म्हनुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची धुळे जिल्हयात विक्री करण्याच्या उद्येशाने तस्करी होत असल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते.
सदर आदेशानुसार माहिती प्राप्त करीत असतांना दिनांक (२२) रोजी पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, साक्री रोड येथे इसम नामे राकेश भारतलाल रेलन याने त्याचे राहते घरी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत विमल पानमसाला गुटख्याची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने साठवणुक केलेली असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पो. नि. दत्तात्रय शिंदे यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास नमुद बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.
त्यानुसार पथकाने साक्री रोडवर इसम नामे राकेश भारतलाल रेलन याचे राहते घरी गेले असता तो मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राकेश भारतलाल रेलन वय ५५ वर्ष व्यवसाय किराणा दुकान रा. ब्लॉक नं. जी-३ रुम नं. ५ साक्री रोड धुळे असे सांगितले. त्यास नमुद बातमीची हकीगत सांगितली असता त्याने सहमती दर्शविल्याने घराची पाहणी केली असता, घरामध्ये खालील नमुद वर्णनाचा व किंमतीचा महाराष्ट्र राज्यात
प्रतिबंधीत असलेला सुगंधीत विमल पानमसाला व तंबाखु मिळुन आली. जप्त करण्यात आलेल्या मालाचे वर्णन
१) महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुंगधीत विमल पानमसाला व तंबाखु २,०९,३१६/- रु. असा एकुन २,०९,३१६/- रु. किं.चा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पानमसाला व तंबाखुची इसम नामे राकेश भारतलाल रेलन याने त्याचे राहते घरात चोरटी विक्री करण्याचे उद्येशाने साठवणुक करुन ठेवल्याने त्याचे विरुध्द धुळे शहर पोलीस ठाणे भाग ५ गुरनं १४६ / २०२४ भादंवि कलम ३२८ सह अन्न सुरक्षा मानके कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलिस अधीक्षक, धुळे,किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्था. गु.शा. चे पो. निरी. दत्तात्रय शिंदे, सपोनि श्रीकृष्ण पारधी,पोउपनि बाळासाहेब सूर्यवंशी,पोहवा संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, संतोष हिरे, तुषार सुर्यवंशी, प्रकाश सोनार, देवेंद्र ठाकुर, चापोहवा कैलास महाजन अशांनी केली आहे.