बनावट GST अधिकारी प्रकरणातील जप्त केलेली रक्कम मुळ फिर्यादीस केली परत…
बनावट GST अधिकारी प्रकरणातील आरोपीकडुन जप्त केलेली रक्कम मुळ मालकास धुळे पोलिस अधिक्षकांनी केली परत…
https://policekakacrimebeatnews.com/dhule-crime-dhule-police-arested-three-bogus-gst-officer-case-looted-truck-driver/
धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 04/01/2024 रोजी फिर्यादी कश्मीरसिंग सरदार हजारासिंग बाजवा, वय 59, व्यवसाय – व्यापार, रा. घर नं. 50/अ, विकास कॉलनी, पटीयाला, ता.जि.पटीयाला, (पंजाब राज्य) यांनी
दि.04/01/2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द आझादनगर पो.स्टे.धुळे येथे .गुरनं 02/2024 भादंवि क.419,420,341,170,171,34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.दि.17/10/2023 रोजी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचे मालाचा मालट्रक क्र.PB-11/CZ-0756 पटीयाला (पंजाब) येथून पुणे येथे जात असतांना धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर लाल दिव्याच्या सुमो वाहनातील खाकी गणवेष परिधान केलेले 3 ते 4 इसमांनी सदरचा मालट्रक अडवून ट्रकचालकास जी.एस.टी. अधिकारी असल्याचे भासवून त्याचे वाहनातील मालाचे कागदपत्रांची पाहणी करुन त्यामध्ये चुका असल्याचे दर्शवून ट्रकचालकामार्फत फिर्यादी यांचेशी फोनद्वारे बोलणे करुन त्यांना जी.एस.टी.च्या दंडाची रक्कम मोठ्या स्वरुपात सांगून तडजोडीअंती रक्कम रुपये 1,30,000/- ही रक्कम फिर्यादीकडून ऑनलाईन पध्दतीने बँक खात्यावर स्विकारुन फिर्यादी यांची फसवणूक केली होती.
सदर गुन्हयाचे तपासात पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एस. ऋषीकेश रेडडी, (भा.पो.से) सहायक पोलिस अधीक्षक, धुळे शहर विभाग धुळे यांनी तसेच तपास पथकातील सपोनि संदीप पाटील, सपोनि उमेश बोरसे, पोहवा कबीर शेख, किरण कोठावदे, महेंद्र भदाणे,पोशि निलेश पाकड,मकसुद पठाण यांनी गुन्ह्याचा तांत्रिक पध्दतीने सखोल तपास करुन आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे (1) स्वाती रोशन पाटील रा.नाशिक (2) बिपीन आनंदा
पाटील (3) ईम्रान ईसाक शेख (4) बबलू ऊर्फ विनय सुरेश बागुल रा. धुळे यांना अटक केली. तपास अधिकारी .एस.ऋषीकेश रेड्डी यांनी आरोपी बबलु ऊर्फ विनय सुरेश बागुल वय 39 रा.पिंजारी चाळ,धुळे यास पोलिस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपुस करून त्याचे ताब्यातून गुन्ह्यातील फसवणुक रक्कम रुपये 1,30,000/- पैकी रु.1,20,000/- ही रक्कम गुन्हयाचे तपासादरम्यान हस्तगत करुन सदरची रक्कम मा.न्यायालयाचे आदेशान्वये पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे
यांचे हस्ते फिर्यादी यांचे ताब्यात दिली आहे.