नाशिक मध्ये बनावट नोटा जप्त, दोन महिलांना अटक…
नाशिक मध्ये बनावट नोटा जप्त, दोन महिलांना अटक…
नाशिक (प्रतिनिधी) – नाशिकरोड येथील मुक्तिधाम जवळ ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह दोन महिलांना सापळा रचून शिताफीनं अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजा कहाणे आणि स्वाती अहिरे अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
(दि.२८मे) रोजी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी यांना माहिती मिळाली की, पुजा कहाणे (रा.जेलरोड नाशिकरोड) नामक महिलेला स्वाती अहिरे नावाच्या एका महिलेने ५ ते ६ दिवसांपुर्वी १०,०००/- रुपये त्यात ५००/- रुपये दराच्या २० नोटा दिल्या होत्या. सदर नोटा हया बनावट सदृष्य असुन नोटा देणारी महिला नाशिकरोड येथील मुक्तीधामच्या बाजुला पुजा कहाने हिला भेटण्यासाठी येणार आहे.
सदरची माहिती चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांना देवुन सदर माहितीवरुन गुंडा विरोधी पथकातील अंमलदार व गुन्हे शाखा युनीट कडील सपोनि सचिन जाधव व अंमलदार यांनी (दि.२८मे) रोजी मुक्तीधाम मंदीर परिसरात सापळा रचला असता तेथे पुजा कहाणे नामक महिला थांबली होती तिच्या जवळ काही वेळाने एक महिला आली असता सदर महिलेने पुजा कहाणे हिच्याशी चर्चा करुन पुजा कहाणे हिला दिलेले पैसे परत मागितले व बनावट नोटांबद्दल कोणालाही काहीही न सांगण्याबाबत विनंती केली त्यावेळी पुजा कहाणे हिने प्लास्टीकची पिशवी स्वाती अहिरे हिच्याकडे दिली त्यावेळी तिस गुंडा विरोधी पथकातील महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी अटकाव केली असता स्वाती अहिरे या महिलेने सदर पिशवीत पैसे असल्याचे सांगितल्याने सदरचे पैसे पिशवीतुन काढुन पाहता त्यात भारतीय चलन रुपये १०,०००/- किंमतीच्या ५००/-रु. दराच्या २० नोटा मिळून आल्या. सदरच्या नोटा बघितल्या असता त्या खऱ्या सारख्या दिसत होत्या परंतु बारकाईने निरीक्षण केले असता त्यात महात्मा गांधी यांचा वॉटरमार्क अस्सल नोट सारखा नाही व सेक्युरिटी ग्रेट नसुन त्या जागी हिरवी पट्टी दिसत होती त्यावरुन सदरच्या नोटा बनावट असल्याचे पथकाचे लक्षात आल्याने सदर महिलेसह १०,०००/- रुपयाच्या बनावट ५००/- रु. दराच्या २० नोटा ताब्यात घेऊन स्वाती देविदास आहिरे रा.सद्गुरु नगर, दसक पंचक, नाशिकरोड नाशिक व पुजा अनिल कहाने रा.केरु पाटील नगर, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक यांचे विरुध्द उपनगर पोलीस ठाणे येथे गुरनं १८९/२०२४ भादंविक ४८९ (क), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चालु आहे.
अशा प्रकारे सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), नाशिक शहर, डॉ.सिताराम कोल्हे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ चे सपोनि सचिन जाधव, गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, डी.के. पवार, राजेश सावकार, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण, नितीन गौतम, सुवर्णा गायकवाड तसेच गुन्हे शाखा युनीट २ चे पो.अं. बाळु शेळके, प्रकाश भालेराव, शंकर काळे, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.