
जिमलगट्टा(गडचिरोली) पोलिसांनी पकडला मोठा देशी दारुचा साठा…
जिमलगट्टा(गडचिरोली)- गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 17/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, आदेश सत्यप्रकाश यादव रा. जिमलगट्टा तसेच त्याचा भाऊ रामनरेश साहेबसिंग यादव हे दोघे मौजा तुमलबोडी(किष्टापूर टोला) येथील बक्का बोडका तलांडी याचे घरी अवैधरित्या विना परवाना मोठ्या प्रमाणात रॉकेट देशी दारु चे साठा करुन वेगवेगळे दारु विक्रेते याना व चिल्लर विक्री करीता साठवून ठेवली आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर , उप पोस्टे जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्र्वर बिरादार व पोलिस स्टाफ यांनी पंचांसह मौजा तुमलबोडी (किष्टापूर टोला) येथे राहत असलेल्या बक्का बोडका तलांडी यांचे घरी जावुन आवाज दिला असता घरात प्रवेश करुन घराच्या दक्षिण कोपर्यात मोठ्या प्रमाणात कागदी काटुन बॉक्स आढळुन आले. त्यानंतर कागदी काटुन बॉक्स उघडुन पाहिले असता, त्यात रॉकेट देशी दारु संत्रा 90 एम.एल. क्षमता असलेले मद्याने भरलेले सिल बंद प्लास्टिक बॉटल आढळुन आले. एका कागदी काटुन बॉक्समध्ये 100 नग सिल बंद प्लास्टिक बॉटल याप्रमाणे 50 कागदी काटुनमध्ये 5000 नग सिल बंद प्लास्टीक बॉटल असुन प्रती नग 35/- रु. प्रमाणे 1,75,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमालाबाबत तलांडी यांच्याकडे विचारणा केली असता, सदरील अवैध दारुचा साठा
1) आदेश सत्यप्रकाश यादव,


2) रामनरेश साहेबसिंग यादव व

3) मनोज मुजुमदार

यांनी विक्री करीता माझ्याकडे साठवुन ठेवले असल्याचे सांगीतले. यावरुन आरोपींचा गावात शोध घेतला असता, आरोपी रामनरेश यादव हा मिळुन आला असून आरोपी आदेश यादव हा पळुन जाण्यात यशस्वी झाला. सदर गुन्ह्राचा पुढील तपास मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली परि.पोउपनि. ज्ञानेश्वर कोल्हे हे करत आहेत.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा सुजीतकुमार क्षिरसागर यांचे नेतृत्वात जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि. संगमेश्वर बिरादार पोउपनि. आनंद गिरे व पोलिस अंमलदार यांनी पार पाडली.
तसेच यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्रात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलिस दलाशी संपर्क साधावा.


