अहेरी पोलिसांनी पकडला देशी-विदेशी दारुचा साठा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अहेरी पोलिसांनी पकडला देशी व विदेशी दारुचा साठा, एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…

अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. दिनांक 02/09/2024 रोजी बैल पोळा, तान्हा पोळा तसेच येत्या काही दिवसात असलेला गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन या उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये व पोलिस स्टेशन हद्दीत अवैधरित्या चालणा­या अवैध धंद्यांवर आळा बसविण्याचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 02/09/2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील ईज्जपवार हे पोलिस पथकासह हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना मौजा कोलपल्ली तालुका अहेरी येथील ईसम 1) देवाजी निला सिडाम वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तह. अहेरी, जि. गडचिरोली हे त्यांच्या राहते घरुन देशी विदेशी दारुची अवैध विक्री करीत आहे.





अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन त्यांचे राहत्या घरी धाड टाकली असता, देशी विदेशी दारुसह एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये, रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या एकुण 10,000 सिलबंद निपा किंमत 8,00,000/- रुपये, किंगफिशर स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या एकुण 80 नग बॉटल किंमत 24,000/- रुपये, हेवड्र्स 5000 स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या 230 नग सिलबंद बॉटल किंमत 57,500/- रुपये, ऑफिसर चॉईस कंपनीच्या 1000 मिली मापाच्या 54 नग सिलबंद बंपर किंमत 54,000/- रुपये असा एकुण 9,35,500/- रु चा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.



संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोउपनि. सागर माने, पोस्टे अहेरी यांचे लेखी फिर्यादीवरुन पाहिजे असलेले आरोपी  1) देवाजी निला सिडाम, वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट, वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार, वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तालुका अहेरी, जि. गडचिरोली यांचे विरुध्द पोस्टे अहेरी येथे अप क्र. 258/2024 कलम 65 (ई), 83 महा. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक. नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधिक्षक (प्रशासन) एम. रमेश व उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे अहेरी पोनि. स्वप्नील ईज्जपवार यांचे नेतृत्वात, सपोनि. मंगेश वळवी, पोउपनि. सागर माने, पोउपनि. अतुल तराळे, पोहवा निलकंठ पेंदाम, नापोशि  हेमराज वाघाडे, पोशि शंकर दहीफळे, मपोशि राणी कुसनाके, चापोहवा दादाराव सिडाम यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!