
आरमोरी पोलिसांनी बंधार्यावरील लोखंडी प्लेट चोरणार्यास वरुड अमरावती येथुन ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड….
आरमोरी हद्दीतील कोलांडीनाला बंधाऱ्यासाठीच्या लोखंडी प्लेट्स चोरी प्रकरणातील आरोपी आरमोरी पोलीसांच्या ताब्यात..
आरमोरी(गडचिरोली)प्रतिनिधी- याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्टे आरमोरी हद्दीतील मौजा वसा, ता व जि. गडचिरोली (कोलांडी नाला) येथील बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणारे १७ नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) व त्यापासून ५०० मीटर अंतरावरील ३० नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) अंदाजे किंमत २,३५,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला होता. त्यावरुन पोलिस स्टेशन आरमोरी येथे अनुक्रमे अपराध क्रमांक ३८२/२०२४ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. व अपराध क्रमांक ३८३/२०२४ कलम ३०३ (२) अन्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.


त्याअनुषंगाने दोन्ही गुन्हयांचा तपास पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक कैलाश गवते यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक प्रताप लामतुरे पोलिस स्टेशन आरमोरी यांनी सुरु केला असता, नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अशाच प्रकारचा गुन्हा पोलिस स्टेशन वरुड जि. अमरावती येथे झालेला असून सदर गुन्ह्यामधील आरोपी अटकेत आहेत.

अशा गोपनिय माहितीवरुन पोलिस स्टेशन वरुड जि. अमरावती यांचेशी संपर्क करून यातील आरोपी कुलदिपसिंग दर्शनसिंग जुणी, वय २७ वर्ष, रा. विडगांव चेरी कंपनीजवळ, नागपूर ता. व जि. नागपूर याला ताब्यात घेवून कौशल्यपूर्वक तपास केला असता, नमुद आरोपीने मौजा वसा ता. जि. गडचिरोली येथील कोलांडी नाल्या बंधाऱ्यातील दोन्ही ठिकाणांवरील लोखंडी प्लेट्स (पल्ले) चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीकडुन चोरी केलेला मुद्देमाल खालील प्रमाणे

१) २.०५ मी लांबी व ०.५ मी. रुंदी असणारे सिल्वर रंगाचे एकुण ३० नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) प्रति प्लेट (पल्ला) वजन अंदाजे १०० कि.ग्रॅ. असून प्रति प्लेट (पल्ला) जु.वा.अं.कि. ५०००/- रु. एकुण १,५०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल. २) २.१५ मी. लांबी व ०.५ मी. रुंदी असणारे सिल्वर रंगाचे एकुण १७ नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) प्रति प्लेट (पल्ला) वजन अंदाजे १०० कि.ग्रॅ. असून प्रति प्लेट् (पल्ला) कि. ५०००/- रु एकुण ८५,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल, असा एकुण २,३५,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक ३०/१२/२०२४ रोजी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असुन, गुन्ह्यांच्या अनुषंगाने पुढील तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधिक्षक (प्रशासन) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप, पोलिस स्टेशन आरमोरीचे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक प्रताप लामतुरे, पोहवा विशाल केदार,पोअंमलदार सुरेश तांगडे, हंसराज धस सरर्व पोलीस स्टेशन आरमोरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली


