दारुतस्कर गोपाल यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन जप्त केला ९ लक्ष रु चा मुद्देमाल..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त,दारु तस्कर गोपाल पोयडवार सह त्याचे साथीदारास घेतले ताब्यात….

गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल. यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दि(25) रोजी पोलिस स्टेशन, आष्टी हद्यीतील दारु तस्कर गोपाल पोयडवार, रा. पारडी, तह. लाखांदुर, जि. भंडारा हा त्याचा सहकारी अंजय्या पुल्लुरवार रा. पेठवार्ड ब्राम्हपूरी, जि. चंद्रपूर याच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्ह्यातुन टाटा कंपनीच्या अरीया या चारचाकी वाहनाने पोस्टे आष्टी व पोस्टे अहेरी येथील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारुचा अवैधरित्या पुरवठा करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुची खेप आणणार आहे.





अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक. उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आष्टी येथे रवाना करण्यात आले. सदर पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार हे कंसोबा मार्कंडा फाटा, आष्टी येथील फॉरेस्ट नाक्याजवळ दि(23) रोजी  दुपारी 12 ते 3.30 वा. चे दरम्यान सापळा रचुन उभे असतांना, सदरचे संशयीत चारचाकी वाहन हे भरधाव वेगाने कंसोबा मार्कंडा फाटा येथील फॉरेस्ट नाक्याजवळ पोहचताच पोलिसांनी सरकारी चारचाकी वाहनाने तात्पुरता अडथडा निर्माण केला असता, वाहन चालकाने वाहन वळवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फॉरेस्ट नाक्याचा चेकींग दांडा खाली घेऊन पळुन जाणा­या वाहनास मोठ्या शिताफिने अडविले.



त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात देशी दारुच्या 50 पेट्या दिसुन आल्याने पोलिसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण 9,00,000/- रु चा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे आष्टी येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ), 98 (2), 83 महा. दा. का. अन्वये आरोपी गोपाल पोयडवार, रा. पारडी तह. लाखांदूर जि. भंडारा व अंजय्या पुल्लुरवार, रा. पेठवार्ड, ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधिक्षक(अभियान) यतिश देशमुख,अपर पोलिस अधीक्षक अहेरी एम. रमेश स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राहुल आव्हाड, पोहवा दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, पोशि श्रीकृष्ण परचाके, श्रीकांत बोईना व चापोशि विनोद चापले यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!