
गडचिरोली येथे देशी विदेशी दारुचा पुरवठा करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर…
दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी विदेशी दारुचा पुरवठा करणाऱ्याच्या स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, चारचाकी वाहनासह एकुण 5,32,800/- रु चा मुद्देमाल केला जप्त….
गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना सुध्दा काही लोकं अवैधरित्या छुप्या रीतीने दारुची विक्री व वाहतुक करतात त्याविरुध्द पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशाचे अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचा पथके रवाना करण्यात आली होती


त्यानुसार काल दि 23 जानेवारी 2025 रोजी पथकास गोपनीय माहीती मिळाली की महेश हेमके, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर हा अवैध रित्या आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनाने देशी व विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतूक करून पो. स्टे. गडचिरोली हद्दीतील मोहझरी गावात राहणारा इसम शिवा ताडपल्लीवार यास पुरवठा करणार आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे चे सपोनि. राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करण्यात आले.

सदर पथक रात्री 23.30 दरम्यान गडचिरोली येथील सत्र न्यायालय समोरील चौकात सापळा रचून बसले असता, एक चारचाकी वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसले. त्यावेळी पोलिसांनी वाहन चालकाला हात दाखवून वाहन थांबविण्याचा इशारा दिला. वाहन थांबताच वाहनाची जवळून तपासणी केली असता सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात अवैध देशी व विदेशी दारू असलेल्या 40 पेटी (बॉक्स) किंमत अंदाजे 3,32,800/- रु. मिळुन आल्याने अवैध दारु सहित एक चारचाकी महिंद्र कंपनीचे झायलो वाहन क्र. एम. एच. 14 सी.एस. 4221 किंमत अंदाजे 2,00,000/- रु. असा एकुण 5,32,800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले तसेच सदर प्रकरणी पोस्टे गडचिरोली येथे 1) रंजीत अरुण सरपे, वय-25 वर्षे, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर, 02) चेतन देवेंद्र झाडे, वय-25 वर्षे, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर याचे विरुध्द कलम 65 (अ), 83, 98 (2) म.दा.का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयात पाहिजे असलेले दोन आरोपी 1) महेश हेमके, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर व 2) शिवा ताडपल्लीवार रा. मोहझरी ता. जि. गडचिरोली यांच्या शोध घेणे सुरु असून सदर गुन्ह्राचा पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधिक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक. अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोशि प्रशांत गरफडे,शिवप्रसाद करमे आणि चापोशि माणिक निसार यांनी पार पाडली.


