गडचिरोली करांचे हरविलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश…
गडचिरोली– तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबधीत पोलिस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलिस दलाच्या सायबर पोलिस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलिस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्तीत जास्त शक्यता असल्यामुळे हरविले किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. या बाबींचा विचार करुन सायबर पोलिस स्टेशन मार्फत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो. सन 2022 या वर्षात एकुण 150 मोबाईल ज्यांची किंमत जवळपास 22 लाख रुपये एवढ्या किंमतीच्या मोबाईलचा शोध सायबर पोलिस स्टेशन मार्फत घेवुन ते मोबाईल संबंधीत व्यक्ती यांना देण्यात आले. तसेच सन -2023 मध्ये एकुण 135 मोबाईलचे शोध घेण्यात आले असुन त्यांची अंदाजे किंमत एकुण 18,80,975/- रुपये एवढी आहे व दिनांक 18/09/2023 रोजी मा. पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचे हस्ते 64 मोबाईल संबधीत व्यक्तींना प्रदान करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता ,अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी उल्हास भुसारी, पोउपनि निलेश वाघ व पोलिस अंमलदार श्रीनीवास संगोजी, वर्षा वहिरवार, संगणी दुर्गे, गायत्री नैताम, किरण रोहणकर, योगेश खोब्राोगडे, सचिन नैताम यांनी पार पाडली.
पोलिस अधीक्षक निलोत्पल. यांचेतर्फे जनतेला असे आवाहन करण्यात येत आहे की, सध्या सायबर गुन्ह्राचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. त्यामुळे जनतेनी सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे व मोबाईल चोरी झाला असेल तर, तात्काळ ceir.gov.in पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी. तसेच आपला ऑनलाईन आर्थिक फ्रॉड झाला असेल तर 1930 या नंबरवर तक्रार नोंदवावी. यासोबतच मोबाईल कुठे हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवुन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच सायबर पोलिस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.