गडचिरोली पोलिसांनी राबवले एक तास स्वच्छतेसाठी अभियान…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गडचिरोली- स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारतर्फे चालविले जाणारे सर्वात महत्वाचे अभियान आहे. याचाच एक भाग म्हणुन “स्वच्छता हि सेवा” या मोहीमे अंतर्गत “एक तारिख एक घंटा” या उपक्रमाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलातर्फे आज दिनांक 01/10/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.00 वा. पर्यंत पोलिस मुख्यालय तसेच जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमाचे व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर स्वच्छता उपक्रम हे  पोलिस अधीक्षक कार्यालय, शौर्यस्थळ, पोलिस संकुल परिसर, पोलिस कॅन्टीन, सीआरपीएफ परिसर, पोलिस मुख्यालय परिसरातील जेटीएससी, एकलव्य हॉल, पोलिस कवायत मैदान, शहिद पांडू आलाम सभागृह इ. परिसरात तसेच जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें परिसरात साफसफाई करुन राबविण्यात आले. यामध्ये वरिष्ठ अधिका­यांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन पोलिस अंमलदारांसोबत मिळुन पोलिस मुख्यालय परिसरात स्वच्छता केली. तसेच सदर स्वच्छता उपक्रमाचे महत्व गडचिरोली जिल्ह्रातील सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी गडचिरोली पोलिस दलातर्फे पोलिस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौक पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकुण 300 पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला. तसेच जिल्ह्रातील जनसामान्य जनतेने या स्वच्छता उपक्रमात आपला सहभाग नोंदवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रम प्रसंगी  अपर पोलिस अधीक्षक  कुमार चिंता यांनी स्वच्छतेचे महत्व पटवुन सांगीतले व आपल्या सभोवताल स्वच्छता राखणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे. तसेच आपले शरीर निरोगी राहावे व आपल्या आजुबाजुच्या परिसरात रोगराई निर्माण न होऊ देता प्रत्येकजणांनी आपले घर व घराच्या आजुबाजुचे परिसर दररोज स्वच्छ करावा असे सांगीतले.


यावेळी आयोजीत कार्यक्रमास पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांच्या मार्गदर्शनाखाली  अपर पोलिस अधीक्षक (अभियान)  अनुज तारे अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता,अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख , उपविभागीय पोलिस अधिकारी कुरखेडा  साहील झरकर व उपविभागीय पोलिस अधिकारी पेंढरी  मयुर भुजबळ हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!