
पुण्यात मैत्रिणीचे अपहरण करून केला बलात्कार; आरोपीला अटक
पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याच्याराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून एका मित्राने आपल्या मैत्रिणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने १९ वर्षीय पीडितेला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
तबरेज शेख (वय १९, रा. शिवाजी मार्केटजवळ, कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना पनवेल आणि बाणेर येथे ५ ते ७ सप्टेबर दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये शिकत आहे. दोघेही मित्र आणि मैत्रिणी आहेत. आरोपीने पीडितेला त्याच्या गाडीवर बसवून पुणे स्टेशन येथे नेले. त्यानंतर तिचे अपहरण करून पनवेल येथे नेले. या ठिकाणी एका लॉजवर तिला नेत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर पुन्हा त्याने पीडितेला बाणेर येथील लॉजवर आणून तेथेही तिच्याशी शारीरीक संबंध केले. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तबरेज शेख याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.




