शेतमोटारपंप चोरणारे चोरटे स्थागुशा पथकाचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

तिरोडा पोलिस स्टेशन हद्दीत  विद्युत मोटार पंप चोरीचा धुमाकूळ घालणारे चोरटे अखेर स्थागुशा पथकाच्या जाळ्यात,तीन आरोपींसह 8 विद्युत मोटार पंप गुन्ह्यांत वापरलेली एक मोटार सायकल असा किंमती 1 लक्ष 16 हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त……

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत थोडक्यात व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात वाढते चोरी, घरफोडीचे प्रमाण, पाहता विशेषतः मोटार सायकल, विद्युत मोटार पंप चोरी, करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करुन  वचक निर्माण व्हावा याकरिता, गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते





या अनुषंगाने वरिष्ठांचे प्राप्त निर्देश व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आलेली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारें जिल्ह्यातील चोरी,घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा, तसेच मोटार सायकल चोरी करणारे तसेच विद्युत मोटार पंप चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचे माहिती काढून शोध घेण्यात येवून माहितीची खातरजमा करून संकलन आणि विश्लेषण करण्यात येत होते



पोलिस ठाणे तिरोडा परिसरातील सालेबर्डी, धादरि, उमरी, सरांडी तिरोडा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटार पंप मागील दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या असल्याने स्थागुशाचे पोलिस पथक विद्युत मोटार पंप चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा मागील दोन महिन्यापासून छडा लावण्यासाठी शोध घेत होते विद्युत् मोटार पंप चोरांचा शोध घेत असताना दिनांक- 09/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय बातमीदारकडून खात्रीशिर माहिती मिळाली की,इसम नामे जितेंद्र पटले याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने मोठ्या प्रमाणात विद्युत् मोटार पंप चोरलेल्या असून लपवून ठेवलेल्या आहेत अश्या प्राप्त खात्रीलायक माहितीवरुन मोटर पंप चोरीचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार



1) जितेंद्र रुपचंद पटले वय-35 वर्ष*

2) आकाश राधेश्याम पटले वय-27 वर्ष*

3) रुपेश रमेश उके वय- 33 वर्षे राहणार- तिन्ही धादरी ता.तिरोडा जि.- गोंदिया

अश्या तिघांना विद्युत मोटार पंप चोरीच्या गुन्हा संबंधाने ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांनाही तिरोडा, धादरी, उमरी, सरांडी, सालेबर्डी परिसरातील विद्युत मोटार पंप, चोरीच्या घटना गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता सुरवातीस उडवाउडवीची उत्तरे देत होते त्यांची कसुन चौकशी केली असता तिघांनीही नमूद परिसरातून रात्र दरम्यान विद्युत मोटार पंप चोरी केल्याचे सांगून कबूल केले यातील आरेपी जितेन्द्र रुपचंद पटले यांचे घरडतीत.1) एक 3 HP PEW कंपनीचा सबमर्सीबल विद्युत मोटार पपं 2) एक GM कंपनीची जुनी वापरती 0.5 HP ची सबमरसिबल मोटारपपं 3) एक ANGLE कंपनीची जुनी वापरती 1.5 HP ची सबमरसिबल मोटारपपं 4) एक SHARP कंपनीची जुनी वापरती 0.5 HP ची सबमरसिबल मोटारपपं असा  एकुण 29,000/- रूपयांचा मुद्देमाल मिळूण आला तो पंचा समक्ष जप्त करण्यात आला तसेच यातील आरोपी 2) आकाश राधेश्याम पटले याचे घरडततीत 1) एक 1.5 HP आकाश कंपनीचा विद्युत मोटार पपं 2) एक जुनी वापरती 0.5 HP ची सबमरसिबल विद्युत मोटारपपं 3) एक TARKO कंपनीची जुनी वापरती 1.5 HP ची सबमरसिबल मोटारपपं 4) एक जुनी वापरती पुसट निळ्या रंगाची कंपनीची नाव नसलेली 1.5 HP चो सबमरसिबल विद्युत मोटार पंप 5) मोटार पंप चोरी करण्याकरिता गुन्ह्यात वापरलेली एक मोटार सायकल हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस क्र. एम.एच 40 एस-2912 असा किमती 87,000/- रुपयांचा मुद्देमाल मिळूण आला तोही जप्त करण्यात आला

अश्या एकूण 8 सबमर्सिबल विद्युत मोटार पंप व गुन्ह्यात वापरलेली मो.सां. किंमती एकूण- 1,16,000/- (1 लक्ष सोळा हजार/- रु. ) रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे विद्युत मोटार पंप चोरीच्या घटना बाबत अभिलेख तपासले असता,

पोलिस ठाणे तिरोडा येथे अप क्रं. 132/2024, व 136/2024, कलम 379 अन्वये विद्युत मोटर चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले तसेच ईतर विद्युत मोटार पंप चोरीच्या घटनेसंबंधाने व पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया व गुन्ह्याचे तपास कामाने ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही सराईत चोरटे गुन्ह्यातील  जप्त विद्युत मोटार पंप मुद्देमाल सह तिरोडा पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे.पुढील तपास कायदेशीर प्रक्रिया तिरोडा पोलिस करीत आहेत

सदरची उत्कृष्ठ दर्जेदार कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक महेश विघ्ने, पोलिस अंमलदार पो.हवा. इंद्रजित बिसेंन, सुजित हलमारे, पो.शि. संतोष केदार, चापोशि घनश्याम कुंभलवार यांनी कामगिरी केलेली आहे..





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!