गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्डयावर छापा…
स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा, 9 इसमांसह 1 लाख 39 हजार 700/- रूपयांच्या मुद्देमालांसह 9 आरोपींना घेतले ताब्यात…..
गोंदिया(प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक निखील पिंगळे ,अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते त्याअनुषंगाने
वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंदया विरूद्ध प्रभावी छापा मोहीम राबवून कारवाई करण्यात येताय त्यानुसार दिनांक-05 फेब्रुवारी 2024 रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे स्था.गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी 17.05 वा. च्या सुमारास पोलिस ठाणे रावणवाडी हद्दीतील मौजा-डांगोर्ली शेतशिवार नाला परिसरात सापळा रचून धाड कारवाई केली असता 52 तासपत्यावर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळ खेळणाऱ्या 09 इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले तासपत्त्यावर जुगार खेळ खेळणाऱ्या इसमांच्या ताब्यातून आरोपीतांचे अंगझडतीत आणि फळावरील रोख रक्कम 15,400/- रु., एकूण 6 नग मोबाईल फोन किमती 49,000/-रु. तसेच दोन मोटर सायकली कि.75,000/-चटई व तासपत्ती किमत 300/- रु असा एकुण 1 लाख 39 हजार 700,/- रुपयांचा मुद्देमाल* जप्त करण्यात आलेला आहे.
जुगार खेळ खेळणारे आरोपी ईसम नामे–
1) देवीलाल ग्यानिराम कहनावत वय-40 वर्ष रा. किन्ही
2) राजकुमार शोभेलाल जमरे वय-40 वर्षे रा. डांगोर्ली
3) अशोक मंगल नागपुरे वय- 45 वर्षे रा. कोहका
4) सचिन प्रेमलाल मेश्राम वय-30 वर्षे रा. दासगाव
5) राधेलाल हनसलाल मेश्राम वय-44 वर्षे रा. डांगोर्ली
6) राजेद्र रामचंद्र नान्हे वय 33 वर्षे रा. डांगोर्ली
7) कंचन कमलप्रसाद दमाहे वय-27 वर्षे रा. कोहका
8) दौलत सुखराम मात्रे वय-40 वर्ष रा. रजेगाव (बगडमारा) ता. किरणापुर जि. बालाघाट (म.प्र)
9) शैलेश नामदेव कुथे वय-28 वर्ष रा. रजेगाव ता. किरणापुर जि. बालाघाट (म.प्र)
यांचेविरुध्द पोलिस ठाणे रावणवाडी*येथे कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
वरिष्ठांच्या निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पो.नि. दिनेश लबडे, स्था.गु. शा. यांचे मार्गदर्शनात सदरची छापा कारवाई पो. उप. नि. महेश विघ्ने, पो.हवा. विठ्ठल ठाकरे, सोमू तुरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, संतोष केदार, अजय रहांगडाले, स्था.गु. शा. गोंदिया, दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे तसेच पो.हवा. रणजीत बघेले, पो.शि. नरेन्द्र मेश्राम, पो. ठाणे रावणवाडी यांनी केलेली आहे.