शतपावली साठी जाणाऱ्या महीलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्यास पोलिसांच्या तत्परतेने झाली अटक..
गोंदिया : याबाबत सवीस्तर व्रु्त असे की दिनांक 03-10- 2023 रोजी चे ०८.00 वाजता दरम्यान तक्रारदार – वंशीका जितेन्द्र कगवानी रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया ही तसेच त्यांची वहीनी रात्री जेवन केल्यानंतर पायी फिरत असतांना खालसा धाबा समोर एक अनोळखी मोटार सायकल चालकाने त्यांचे विरूध्द दिशेने जवळ येवुन तिचे गळ्यातील सोन्याची चैन जबरीने ओढुन चोरी केल्याने ती जोराने ओरडल्याने रस्त्याने जाणारे साध्या वेशातील पोलिसांनी त्यास पकडुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव- *नौमीत कबीर सोनवाने वय 20 वर्ष, रा. गौशाला वार्ड, गोंदिया* असे सांगीतले वरून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पँटचे खिशातून जबरी चोरी केलेली सोन्याची चैन वजन अंदाजे 10 ग्रॅम किंमती अंदाजे- 60,000/- रू. मिळुन आल्याने फिर्यादी यांचे तक्रारी वरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रं.653/2023 कलम 392 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
निखील पिंगळे, पोलिस अधिक्षक, गोंदिया, अप्पर पोलिस अधीक्षक . अशोक बनकर, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलिस स्टेशन गोंदिया शहर चे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार पोहवा कवलपालसिंग भाटीया पोशि मुकेश रावते, पोशि सुभाष सोनवाने, विशेष बाब अशी की, पोशि सुभाष सोनवाने हे साप्ताहीक रजेवर असतांना खालसा ढाबा येथे परीवारासह आले होते. महीलेचे ओरडण्याचे आवाज आल्याने पोशि सुभाष सोनवाने हे मदतीस धावुन त्यांनी तात्काळ तत्परतेने *आरोपी नौमीत कबीर सोनवाने वय 20 वर्ष, रा.गौशाला वार्ड, गोंदिया यास अटक* करून सोन्याची चैन वजन अंदाजे 10 ग्रॅम किंमती अंदाजे 60 हजार रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि सागर पाटील पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहे.
सदरची कारवाई . निखील पिंगळे, पोलिस अधिक्षक, गोंदिया, अशोक बनकर, अपर पोलिस अधिक्षक, गोंदिया, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन गोंदिया शहरचे पोलिस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. सागर पाटील, पो. हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, दिपक रहांगडाले, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, कुणाल बारेवार, अशोक रहांगडाले, यांनी केली.