गोंदीया शहर पोलिसांनी घरफोडी करणारे दोघे घेतले ताब्यात,घरफोडीचा १ गुन्हा केला उघड…
गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की की, तक्रारदार महिला- खुर्शीदा नसिर शेख रा. पंचशिल चौक माताटोली गोंदिया हया दि. 28 /10 / 2023 रोजी सकाळी 08.00 वा. पतीसोबत मुलीकडे नागपूरला कार्यक्रमाकरीता गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपुन दि. 01/11/2023 रोजी 12. 00 वा. घरी परत आलेवर घराचा मुख्य दरवाज्याचा कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. घरात जावून पाहीले असता, घरातील लोखंडी आरमारीत ठेवलेले दागिने ज्यात- दोन अंगठया, गळयातील हार ,दोन जोडी कानाचे झाले, एक मंगळसुत्र, एक नथ, दोन चांदीचे पायपट्टी,एक जोडी चांदीचे बिछवे, एक लावा कंपनीचा किपेड मोबाईल, नोकीया कंपनीचा मोबाईल, गल्ल्यातील चिल्लर 1500/-रूपये, रोख रक्कम 35,000/-रू असा एकूण 2 लाख 10 हजार 890/- रुपयाचे मुद्देमाल चोरी झाल्याने अज्ञात चोरट्याविरूद्ध पो. स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्र. 708/2023 कलम 380, 454, 457, भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. ..
पोलिस अधिक्षक, निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना तपासाचे अनुषंगाने दिलेल्या निर्देश सुचने प्रमाणे पोलिस स्टेशन गोंदिया शहरचे पोलिस निरीक्षक सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदारानी गोपनिय माहितीच्या आधारे- आरोपीत ईसंम नामे
*1) अभिषेक ऊर्फ जादू प्रेमलाल वर्मा वय 19 वर्ष, रा. रामचंद्र आईल मिल जवळ, श्रीनगर, गोंदिया*
*2) घनशाम ऊर्फ गोलू अशोक चौधरी वय 19 वर्ष – रा. श्रीनगर, मालविय वॉर्ड, गोंदिया*
यांना ताब्यात घेण्यात आले. पो. स्टे. ला आणुन विश्वासात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने कसून तपास केला असता दोघांनीही संगणमत करुन चोरी केल्याचे कबुल केले. नमूद दोन्ही आरोपीतांचे ताब्यातून घरफोडी गुन्ह्यांत चोरीस गेलेला मुद्देमाल 2 नग अंगठी, गळयातील हार, दोन जोडी कानाचे झाले, मंगळसुत्र,नथ, दोन चांदीचे पायपट्टी, एक जोडी चांदीचे बिछवे *असा एकुण-1 लाख 78 हजार 880/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे* सदर गुन्हयाचा तपास सुरु असुन तपास सपोनि. सागर पाटील, पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत…
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक, गोदिया, निखील पिंगळे,अप्पर पोलिस अधिक्षक,अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग गोंदिया सुनिल ताजने, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन गोंदिया शहरचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स. पो.नि.सागर पाटील, पो. हवा. कवलपाल भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, मपोहवा. रिना चौव्हाण, पो.शि. अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली.