गोंदिया पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया अंतर्गत भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी यांचे करीता रनिंग ट्रॅक चे निर्माण……
सालेकसा(गोंदिया) – पोलिस अधीक्षक गोंदिया, . निखिल पिंगळे(भापोसे)यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून अप्पर पोलिस अधीक्षक” अशोक बनकर.कॅम्प देवरी,उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस स्टेशन सालेकसा यांचे नेतृ्त्वाखाली सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया चे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एकनाथ डक , संतोष माळगे व अंमलदार यांचे मदतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलिस दूरक्षेत्र पिपरीया येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यात येत आहे सदर प्रशिक्षणासाठी दुरुक्षेत्र हद्दीतील जवळपास 50 ते 60 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत परंतु प्रशिक्षणार्थींना रनिंग करण्यासाठी व्यवस्थित ट्रॅक नव्हता पोलिस चोकीचे चे अधिकारी व अंमलदार आणि प्रशिक्षणार्थी असे मिळून रनिंग साठी ट्रॅक बनवण्याचे ठरवून ट्रॅक्टर, रोलर , विद्यार्थ्यांनी व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनतीने उत्तम असा रनिंग चा ट्रॅक बनवला व त्याचे उद्घाटन दिनांक 28/10/ 2023 संकेत देवळेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस स्टेशन सालेकसा तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि युवक हजर होते.
या झालेल्या रनींग ट्रॅकचा परीसरातील युवकांना,युवतींना निच्छितच फायदा होईल व भविष्यात ते त्यांचे देशसेवेचे स्वप्न पुर्ण करतील यात काही शंकाच नाही