
जबरदस्तीने दागिणे हिसकावणारे गुन्हे शाखा व अर्जुनी मोरगाव पोलिसाचे ताब्यात…
चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून जबरीने सोने हिसकावून नेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखा व अर्जुनी मोरगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्तिक कार्यवाहीत केले जेरबंद….
.गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(14)ॲागस्ट 2024 रोजी दुपारी 4.30 वाजता चे सुमारास मिनाल होमराज बहेकार वय 26 वर्षे रा. येरांडी/देवी,अर्जुनी – मोरगाव हे आपल्या मोटार सायकलने येरंडी येथुन सिलेझरी मार्गे अर्जुनी/मोर कडे येत असतांना अज्ञात तिघे आरोपी हे पल्सर मोटार सायकलने मागुन येवुन विहीरगाव फाट्याजवळ फिर्यादीस थांबवुन चाकु व बंदुकीचा धाक दाखवुन तुझ्याजवळ जे काही आहे ते काढुन दे असे म्हणुन फिर्यादीच्या हाताचे बोटातील – 1) एक सोन्याची अंगठी 06 ग्रॅम वजनाची किंमती 24,000/-रू 2) एक सोन्याची अंगठी 05 ग्रॅम वजनाची किंमती 20,000/- रू. असा एकुण किंमत 44,000/- रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेले


अशा फिर्यादी यांचे तक्रारीवरुन पोलिस. ठाणे- अर्जुनी/मोरगाव येथे अपराध क्रमांक- 257/2024 कलम 309(4), 3 (5) भारतीय न्याय संहिता- 2023, सहकलम 3,5 भा.ह.का.1959 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास अर्जुनी/मोरगाव पोलिसांकडून करण्यात येत होता तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुध्दा सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते

सदरचा तपास करीत असतांना स्थागुशा पथकास बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे स्थागुशा पथकाने दिनांक 15/08/2024 रोजी यातील संशयित 1) विक्की रामकृष्ण लाडे वय 18 वर्ष रा. मुरझा ता. लाखादुर जि. भंडारा 2) मनिष जयगोपाल दोनोडे वय 19 वर्ष रा. येरंडी/देवी ता. अर्जुनी/मोर जि. गोंदिया यांना नमूद गुन्हाचे अनुषंगाने ताब्यात घेवून नमूद गुन्ह्याचे घटनेबाबत सविस्तर विचारपुस चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी आणखी दोघा आरोपीच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली यावरून पोलिस ठाणे अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आरोपी
3) समीर रमेश मेश्राम वय 19 वर्षे राहणार – बारव्हा, तालुका – लाखांदूर, जिल्हा – भंडारा 4) मंथन गौतम टेंभुर्णे वय 19 वर्षे रा- खोलमारा, तालुका- लाखांदूर, जिल्हा – भंडारा यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे

यातील चारही आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने चारही आरोपींचा दिनांक 19/08/2024 रोजी पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे.सदर गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपीना सखोल विचारपूस, चौकशी, तपास, गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत प्रक्रिया कायदेशीर कारवाई अर्जुनी मोरगाव पोलिस करीत आहेत
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी, देवरी विवेक पाटील, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा दिनेश लबडे, पोलिस निरीक्षक.कमलेश सोनटक्के, पो.ठाणे- अर्जुनी/मोर, यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. तुलसीदास लुटे, इंद्रजित बीसेन, पो.शि. संतोष केदार, हंसराज भांडारकर, चा.पो.शि.खंदारे तसेच तांत्रीक सेलचे दिक्षित दमाहे, धनंजय शेंडे, रोशन येरने,संजय मारवाडे आणि पो. ठाणे अर्जुनी/ मोर येथील – पोउपनि किरण मेश्राम, रोहनकर, पो.हवा. रमेश सेलोकर, बापू येरणे, रोशन गोंडाणे, पो.शि. लोकेश कोसरे, गिरीश लांजेवार, चापोहवा भाजीपाले यांनी केली.


