गोंदिया पोलिसांनी उघड केला सिव्हील लाईन येथील घरफोडीचा गुन्हा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सिव्हिल लाइन्स येथे घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अखेर गोंदिया शहर पोलिसांच्या जाळ्यात,घरफोडीच्या गुन्ह्यातील 15 लाख 33 हजार रु चे दागीणे केले हस्तगत,गोंदिया शहर पोलिसांची धडाकेबाज कामगीरी….





गोंदीया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक- 9 मार्च 2024 रोजी फिर्यादी नामे मो. जाफर मो. आमीन कंडुरेवाला वय 45 वर्षे, रा.सिव्हील लाईन, गोंदिया हे बाहेरगावी गेले असता त्यांचे राहते घराचे समोरील दाराचा कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन आलमारीत ठेवलेले सोण्याचे दागिणे 55 तोळे, टॅब व रोख रक्कम असा एकूण 20 लाख 74 हजार 500/- रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यान्नी चोरुन नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारी वरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्र.120/2024 कलम 454, 457, 380 भादंवी. अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता



पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक,नित्यानंद झा, यांनी गुन्ह्याचे स्वरूप पाहता सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटे गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेवून जेरबंद करण्याचे निर्देश सूचना दिलेल्या होत्या,वरिष्ठांचे आदेशानुसार नमूद घरफोडी गुन्हातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याकरिता पोलिस ठाणे गोंदिया शहर, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया ची विविध पथके तयार करून नेमण्यात आलेली होती पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे गुन्हेगारांचा शोध घेण्याकरिता कसोशीने प्रयत्न करण्यात आले घरफोडी झालेल्या गुन्हाचे घटनास्थळ शेजारील तसेच सदर मार्ग परिसरातील जवळपास 200 च्या वर सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासण्यात आले एकंदरीत सी. सी. टी. व्ही. फुटेज आणि गोपनीय माहितगार आणि गोपनिय सुत्राच्या माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा अट्टल चोरटा आरोपी नामे साहील उर्फ माट्या राजु आंबेकर रा. विठ्ठल मंदीर वार्ड, निबांळकर वाडी चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने



सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून पळून गेल्यानंतर त्याने वर्धा येथे खून केल्याने त्यास वर्धा येथील गुन्ह्यांत अटक करण्यात आलेली होती त्यामुळे गोंदिया शहर पोलीसांनी वर्धा रेल्वे पोलीस स्टेशन येथे जावुन खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी हा गोंदिया येथे घरफोडीचा गुन्हा केलेला आरोपी असल्याने अट्टल चोरटा नामे साहील उर्फ माट्या राजु आंबेकर यास घरफोडी गुन्ह्यांत ताब्यात घेवून घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने कसुन चौकशी व तपास केला असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीचे राहते घराची चंद्रपुर येथे जावुन घरझडती घेतली असता नमूद घरफोडीचे गुन्ह्यांत चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आलेला आहे 1) सोन्याचे कंगन 02 जोडी,2) सोन्याचे बांगड्या 08 नग,3) सोन्याचे झुमके 01 जोडी,4) सोन्याचे झुमके 01 नग,5) सोन्याचे अंगुठी 03 नग,6) सोन्याचा हार 03 नग,7) सोन्याचा चैन 02 नग 8) सोन्याचे पौलीश केलेले 03 नग हार,9)सोन्याचे पॉलीश केलेली आंगठी 1 नग,10) सोन्याचे पॉलीश केलेले झुमके,11) 06 नग पांढ-या रंगाचा बेनटेक्सच्या आंगठ्या असा एकुण  15 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आला आहे.

सदर घरफोडीचे गुन्ह्यात अटक करण्यात आलेला अट्टल गुन्हेगार आरोपी नामे साहील उर्फ माट्या राजु आंबेकर रा. विठ्ठल मंदीर वार्ड, निबांळकर वाडी, चंद्रपुर ता. जिल्हा. चंद्रपुर हा अट्टल गुन्हेगार असून याने आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले तियात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह ,रामनगर,राजुरा,चंद्रपूर शहर,येथे तसेच गुन्ह्यांची वर्धा रेल्वे येथे  खुनाचा गुन्हात तो अटकेत होता गोंदिया येथे घरफोडीचा गुन्हा असे एकुन 25 गुन्ह्यांची मालिकाच केलेली आहे नमूद घरफोडीचे गुन्ह्याचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे निर्देशानसार स.पो.नि. सोमनाथ कदम पोलिस ठाणे गोंदिया शहर हे करित आहेत,आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता दिनांक 26/03/2024 रोजी पर्यंत आरोपीचा पोलिस कोठडी रिमांड मिळालेला आहे

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागिय पोलिस अधिकारी गोंदीया रोहीणी बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन गोंदिया शहरचे पोलिस निरिक्षक  चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सोमनाथ कदम,विजय गराड, पो.हवा. जागेश्वर उईके, दिपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, कवलपालसिंग भाटीया, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, निशिकांत लॉदासे, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक राहांगडाले, मुकेश रावते, कुणाल बारेवार यांनी केली आहे तर सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध व गुन्ह्यांचा उलगडा करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेतील पथक स. पो.नि.शिंदे,पोउपनि विघ्ने, सायकर, पोहवा. राजु मिश्रा, मेहर, देशमुख, शेख, तूरकर, बीसेन, भेलावे, हलमारे, गायधने, तिवारी, केदार, रहांगडाले, ठाकरे, भांडारकर, यांनी सुध्दा रात्रंदिवस मेहनत घेवुन अथक परिश्रम घेतले आहे





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!