गुन्हे शाखेने १२ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन,12 किलो 160 ग्रॅम गांजासह 2 लक्ष 69 हजार 500/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…..
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजाचा वापर, तस्करी, विक्री करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी एन.डी.पी. एस. कायद्याअंतर्गत प्रभावी दर्जेदार धाडी घालून कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते.
त्याअनुषंगाने वरिष्ठांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. चे पथक जिल्ह्यात अंमली पदार्थ बाळगून तस्करी, विक्री व काळाबाजार करणाऱ्या गुन्हेगारांचा, तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांचे माहिती घेत असताना स्था. गु. शां. पथकास दिनांक- 29/07/2024 रोजी गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, दोन इसम हे ओडिसा येथून रायपुर मार्गे रेल्वेने गांजाची खेप घेवून गोंदिया मरारटोली, भागात येणार आहेत अशा खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहीती पथकाने पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांना सदरची माहिती कळवून वरिष्ठांचे आदेशावरुन मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलिस ठाणे रामनगर हद्दीत मरारटोली बसस्थानक समोरील गोंदिया ते बालाघाट जाणाऱ्या रोडवर सापळा रचून छापा कारवाई करण्यात आली
सदर कार्यवाहीत अवैधरित्या गांजा ची खेप घेवून येणाऱ्या दोघांना मोटारसायकलसह दुपारी 3.30 वाजता दरम्यान रंगेहाथ पकडण्यात आले. त्या दोघांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) दिनेश विजयकांत मिश्रा, वय 38 वर्षे, रा. काका चौक , सिव्हिल लाइन्स गोंदिया 2) सोमेश्वर जोशीराम न्यायकरे वय 36 वर्षे राह. गिरोला, पांढराबोडी तां. जि. गोंदिया अशी सांगितली यावरुन दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांचे जवळील दोन्हीं बॅगची पंचासमक्ष पाहणी केली असता त्याचे ताब्यातील निळ्या रंगाच्या ट्रॉली व स्कुल बॅगमध्ये सेलोटेप ने गुडाळलेले (वेस्टन असलेले) 12 नग बंडल मिळुन आले वेस्टन असलेल्या बंडलची पंचासमक्ष खोलून पाहणी केली असता, त्यात हिरवा ओलसर पाने, फुले आणि बिया मिश्रीत एकूण वजन 12 किलो 160 ग्रॅम, उग्र वास येत असलेला गांजा एकूण किंमत 2,69,500/- मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे.
सदर आरोपी विरूध्द पो.हवा. राजेंद्र मिश्रा, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे फिर्याद वरून पोलिस ठाणे रामनगर येथे एन. डी. पी. एस. कायदा कलम 8 (क), 20, 29 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह रामनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया व गुन्ह्यांचा तपास रामनगर पोलिस करीत आहेत
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाऱ्खा दिनेश लबडे, पोलिस निरीक्षक. प्रविण बोरकुटे पो.ठाणे रामनगर यांचे मार्गदर्शनात मपोउपनि-वनिता सायकर पोलिस अंमलदार पो.हवा. राजू मिश्रा, महेश मेहर, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, भूवनलाल देशमुख, सुजित हलमारे, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, संतोष केदार, चापोशि घनश्याम कुंभलवार, मपोशि कुमुद येरणे, यांनी कारवाई केलेली आहे..