स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा मुंडीपार येथील जुगार अड्ड्यावर छापा…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा मुंडीपार येथे जुगार अड्ड्यावर छापा,10 जुगारींसह 2 लक्ष 69 हजार 310 रूपयांचा मुद्देमाल केला जप्त….
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर छापा टाकुन दर्जेदार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंदया विरूद्ध प्रभावी धाड मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे
.या अनुषंगाने दिनांक- 20/08/2024 रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन गोरेगाव हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की मुंडीपार येथे काही ईसम जुगार खेळत आहे अशा माहीतीवरुन पथकाने सायंकाळी 07.05 वा. ते 08.00 वा. च्या सुमारास पोलिस ठाणे गोरेगाव हद्दीतील मौजा- मुंडीपार परिसरात सापळा रचून छापा टाकला असता त्याठिकाणी 52 तास पत्यावर पैशांची बाजी लावून हारजीत चा जुगार खेळ खेळणाऱ्या 10 इसमांना मोठ्या शिताफीने घेराव घालून ताब्यात घेतले तसेच तास पत्त्यावर जुगार खेळ खेळणाऱ्या इसमांच्या ताब्यातून अंगझडतीत आणि फळावरील रोख रक्कम 19,500/- रु., एकूण 8 नग मोबाईल फोन किमती 59,150/- रु. तसेच तिन मोटर सायकली किंमती 1,90,000/- रु., व तासपत्ती चे 12 नग कॅट किमती 660/- रु असा एकुण 2 लक्ष 69 हजार 310,/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच 1) प्रवीणकुमार मथाराम पटले वय-34 वर्ष रा. मुंडीपार ता. गोरेगाव जि.गोंदिया 2) सुजय सुशील मजुमदार, वय 45 वर्षे, रा. मुंडीपार ता. गोरेगाव जि. गोंदिया 3) डिलनसिंग त्रिलोचनसिंग समन्से, वय 36 वर्षे, रा. घुमर्रा ता. गोरेगाव जि. गोंदिया 4) विकास आनंदराव चव्हाण, वय 35 वर्षे, रा. भडंगा, ता. गोरेगाव,जि.गोंदिया 5) उमेश गोंविदराव राउत, वय 33 वर्षे, रा. मुंडीपार ता. गोरेगाव जि.गोंदिया6) संतोष सुकलाल टेर्भेकर, वय 43 वर्षे, रा. मुंडीपार ता. गोरेगाव जि. गोंदिया 7) अमित रामदास डोये, वय 41 वर्षे, रा. पालेवाडा ता. गोरेगाव जि. गोंदिया 8) संतोष ताराचंद चौधरी, वय 23 वर्षे, रा. मुंडीपार ता. गोरेगाव जि. गोंदिया 9) देवानंद अनंतराम वाकले वय 36 वर्ष रा. घुमर्रा ता. गोरेगाव जि. गोंदिया 10) कमलेश विनोद डहारे वय-28 वर्ष रा. पालेवाडा ता. गोरेगाव जि.गोंदिया. यांचेविरुध्द पोलिस ठाणे- गोरेगाव येथे कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांचे आदेशाने पो. नि. दिनेश लबडे, स्था.गु. शा. यांचे मार्गदर्शनात पो. उप.नि.शरद सैदाने,पोहवा. विठ्ठल ठाकरे, तुलसी लुटे, पोशि.संतोष केदार, अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, दुर्गेश पाटील, चालक- घनश्याम कुंभलवार स्था.गु. शा. गोंदिया, यांनी केली आहे..