कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे गोंदिया पोलिसांचे ताब्यात..
कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे रावणवाडी पोलिसांचे ताब्यात,एकुन किंमत 14 लक्ष 60 हजाराचा मुद्देमाल केला जप्त, 26 बंदिस्त जनावरांना दिले जिवनदान केले गौशाळेत दाखल….
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी सन उत्सवाच्या निमित्ताने जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे, करणारे गुन्हेगार, अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्यांवर, जनावरे वाहतुकीवर आळा घालण्याकरीता सर्व ठाणे, प्रभारी यांना निर्देशित केले होते
या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग गोंदिया रोहिणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे रावणवाडीचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात रावणवाडी पोलिसांनी दि.(२३) रोजी एका आयचर ट्रक मध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावरांना कोंबुन वाहतुक करीत आहेत अशा प्राप्त माहीती वरून मौजा- रजेगांव शेतशिवार रोडवर सापळा रचून कारवाई केली असता एक पांढ-या रंगाचा सहाचाकी आयसर क्र.एम.एच-३७ टी-३००२ किंमती अंदाजे १२,०००००/-रुपये (बारा लक्ष) ज्यामध्ये काळ्या, पांढ-या व लाल रंगाचे एकुण २६ नग गोवंशीयय जनावरे प्रत्येकी किं. अंदाजे १०,०००/-रुपये प्रमाने एकुण किमती २,६०,०००/-रुपये असा एकुण किंमती १४,६०,०००/- रु चा दिसुन आला
सदर ट्रक व जनावरांची पाहणी केली असता आयसर वाहनामध्ये जनावरांचे चारही पाय दोरीने अत्यंत निर्दयतेने व क्रुरतेने बांधुन त्यांना चारा-पाण्याची सोय व्यवस्था न करता व त्यांना बसण्याची पुरेशी जागा उपलब्ध न करता तसेच जनावरांची कोणतेही प्रकाराची वैद्यकिय उपचाराची सोय न करता त्यांना कोंबुन अवैधरित्या वाहतुक करतांनी मिळून आल्याने पोलिस ठाणे रावणवाडी येथे अप क्रं. ११०/२०२४ कलम ११, (१) (ड) प्रा. क्र. वा. प्र. अधि. १९६० सहकलम ५ (अ),९ (अ) म.प्रा.सं. अधि.१९७६ सहकलम १०९ भा.दं. वी* अन्वये पो.शि. छगन विठठले पोलिस ठाणे रावणवाडी यांचे तक्रारीवरून आरोपी नामे 1) विशाल सुखदेव इंगोले वय 24 वर्ष रा. पिंपरी खुर्द, पो. अरक ता. मंगरुळपीर जि. वाशिम गोवंश मालक नामे 2) इमरान रहेमान शेख वय 30 वर्ष रा. चंगेरा ता.जि. गोंदिया यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवार्ड पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी बनकर यांच्या मार्गदर्शखाली पोलिस ठाणे रावणवाडी चे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सपोनि सुनिल अंबुरे, पोउपनि राहुल बागुल , पो.हवा. संजय चौव्हाण, सुशिल मल्लेवार पो शि. विठठले यांनी कार्मागरी केलेली आहे.
सदर कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेला मुद्देमाल एकुन २६ नग गोवंशीय जनावरे यांना त्यांचे चारा पाण्याची सोय व्हावी व सुरक्षिततेच्या दृष्टीने विठठल रुक्मिणी ट्रस्ट गोशाळा कोरणी (घाट) येथे दाखल करण्यात आले आहे