जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा वाळु माफीयांना दणका,संयुक्तिक कार्यवाही ३ कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोंदिया जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा वाळु माफियांना दणका संयुक्तिक कार्यवाहीत घाटकुरोडा व घोगरा येथील नदीवरील घाटावर जाऊन ४ टिप्पर व ७ पोकलॅंडसह ३.५ कोटीचा मुद्देमाल केला जप्त….

गोंदीया(प्रतिनिधी) –  याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, गोंदिया जिल्हयात प्रामुख्याने तिरोडा परिसरात वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे होणारे अवैध उत्खनन आणि रेतीची अवैधरित्या होणारी चोरी आणि वाहतूक तक्रारीच्या अनुषंगाने. दि 11 जानेवारी  रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी श्री प्रजीत नायर, तसेच पोलिस अधिक्षक गोरख भामरे,यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत गोंदिया जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचे पथक व तहसिल कार्यालय तिरोडा, पोलिस ठाणे तिरोडा येथील अधिकारी व अंमलदार, कर्मचारी पथकासह मौजा- घाटकुरोडा व घोगरा येथील वैनगंगा नदीपात्रावर अचानक छापा टाकुन रेतीसाठा करून ठेवलेल्या ठिकाणी नदी किणाऱ्यापासुन अंदाजे 70 ते 100 मीटर अंतरावर टिप्पर आणि पोकलँन्ड यंत्र सामुग्रीच्या साहाय्याने रेतीचे उत्खनन व वाहतुक होत असल्याचे  आढळुन आले





वैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती चे उत्खनन, रेतीचा साठा, वाहतूक करण्याचे उद्देशाने उभे असलेल्या 4 टिप्पर व 7 पोकलँन्डचे चालक- मालक यांच्यावर पोलिस ठाणे तिरोडा येथे  श्री. नारायण ठाकरे, तहसीलदार तिरोडा यांचे तक्रारीवरून अवैधरित्या रेतीची चोरी व उत्खनन प्रकरणात अपराध क्रमांक- 043/2025 कलम 303(2), 62, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. वरिष्ठांच्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक पो.ठाणे तिरोडा अमित वानखडे, यांचे मार्गदर्शनात पो उप नि कोंडे करीत आहेत



सदरची कारवाई प्रक्रिया दुपारी- 12.00 वा. ते रात्री उशिरापर्यंत करण्यात आलेली असून जप्तीपत्राप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन  07 पोकलॅन्ड यंत्र सामुग्री हे मौक्यावरुन हलविणे शक्य नसल्याने त्यांचे मालक व चालक यांच्या तात्पुरत्या सुर्पदनाम्यावर देण्यात आलेत व 4 टिप्पर तहसिल कार्यालय येथे हलविण्यात येवून तिरोडा तहसिलच्या कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले.



सदरची संयुक्तिक कार्यवाही मा. जिल्हाधिकारी श्री. प्रजीत नायर, पोलिस अधिक्षक गोरख भामरे, यांचे आदेशानुसार व प्रत्यक्ष उपस्थितीत तहसीलदार तिरोडा श्री. नारायण ठाकरे, पोलिस निरीक्षक तिरोडा अमित वानखडे, नायब तहसीलदार तिरोडा श्री. ए.पी. मोहनकर, मंडळ अधिकारी मुडीकोटा- श्री.पी.बी. निमजे, कु.बी.डी. पटले तलाठी घोगरा, श्री. सजु बान्ते बीट अंमलदार मुडीकोटा, श्री.ए.पी. भुते तलाठी- सराडी, मुडीकोटा, नवेगाव खुर्द श्री. रत्नदिप प्रकाश चौरे कोतवाल घोगरा यांनी केली

 

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!

WhatsApp us