गंगाझरी हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश याचेवर गोंदीया पोलिसांची हद्दपारीची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गंगाझरी पोलिस स्टेशन, हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश कन्सरे यास गोंदिया जिल्ह्यातून 6 महिन्याच्या कालावधी करीता केले हद्दपार…

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे गंगाझरी परिसरातील सराईत गुन्हेगार आकाश सुशिल कंन्सरे, वय 22 वर्षे, राहणार- कोहका, तालुका, जिल्हा – गोंदिया* याचेविरुद्ध पोलीस ठाणे गंगाझरी येथे अवैध दारू विक्री, भांडण, मारहाण, दंगा करणे, जबरीने इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, गृह अतिक्रमण, विनयभंग, धमकी देणे, अश्याप्रकारचे गंभीर 6 गुन्हे दाखल आहेत..
पोलिस ठाणे गंगाझरी पोलिसांनी नमूद सराईत गुन्हेगार आकाश विरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्याचे चारित्र्यात आणि सवयीत कसलीही सुधारणा झालेली नाही सदर गुन्हेगार हा सवयीचा मगरूर व धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होवून त्याच्या कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याचेविरूद्ध पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे गंगाझरी यांनी गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करणे करीता महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 56 (1),(अ),(ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव उपविभागिय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचेकडे मंजुरीस्तव सादर केला होता उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचे आदेशानुसार प्रमोद मडामे, उपविभागीय पोलिस अधिकारी, तिरोडा यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून नमूद गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती.





या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांनी नमूद सराईत गुन्हेगार जाब देणार यास 6 महिन्याच्या कालावधी करीता गोंदिया जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिनांक- 09/02/2024 रोजी पारित केले असून सराईत गुन्हेगारास आदेश प्रत तामील करून गोंदिया जिल्ह्यातून 6 महिन्याच्या कालावधी करीता हद्दपार करण्यात आले आहे गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया – पर्वणी पाटील, यांनी केलेल्या हद्दपार कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून गंगाझरी पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे..



सदरची कारवाई निखिल पिंगळे, पोलिस अधिक्षक गोंदिया, नित्यानंद झा, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग तिरोडा, प्रमोद मडामे, यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून यापुढेही पोलिस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात अवैध कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे



 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!