
गंगाझरी पोलिसांनी अवैधरित्या गौण खनिज चोरी करणार्यास केली अटक,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
गंगाझरी(गोंदिया) सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, यांनी नवरात्र उत्सव व छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी यासारखे व इतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून धडक कारवाई करण्यात येत आहे.


त्यानुसार पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, .अशोक बनकर यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग तिरोडा,. प्रमोद मडामे, पो. स्टे. गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली गंगाझरी परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध व गुन्हेगारी प्रवूत्तीच्या इसमांविरूद्ध कारवाईची मोहीम राबविण्यात येत होती

याचाच एक भाग म्हनुन पो.स्टे. गंगाझरी येथील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार दिनांक *16/10/2023 रोजी* नवरात्र उत्सव निमित्ताने हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी 05.10 वा. चे सुमारास मौजा बोरा ते डब्बेटोला रोडवर, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथे अवैधरीत्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या इसमास टिप्पर क्रमांक एमएच 40 सीडी 0562 सह पकडले.सदर प्रकरणी पो. ठाणे गंगाझरी येथे ट्रॅक्टर चालक
*1) साहिल नवाज अली सय्यद, वय 23 वर्षे, रा. काचेवाणी, ता. तिरोडा, जि. गोंदिया*

व *मालक सौरभ होमेंद्रसिंग चौव्हाण, वय 35 वर्ष, रा. ता. तिरोडा, जि. गोंदिया*
यांचेविरुद्ध पो. ठाणे गंगाझरी येथे अपराध. क्र. 418/2023 कलम 379, 34 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला असून *वरील नमूद आरोपी याचे ताब्यातून*
1) एक टिप्पर क्र. एमएच 40 सीडी 0562 किंमत 20 लाख रु. व त्यामध्ये रेती 05 ब्रास रेती किंमत 25 हजार रु. *एकूण किंमत 20 लाख, 25 हजार रूपयाचा** मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दिनांक 06/10/2023 रोजी वर नमूद टिप्पर व नमूद दोन्ही आरोपींवर पोलिस स्टेशन तिरोडा येथे रेती चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई . वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे गंगाझरीचे पोलिस निरीक्षक महेश बनसोडे, पोउपनि पराग उल्लेवार यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे गंगाझरी येथील सुनील अंबुले, पोहवा सुभाष हिवरे, चापोहवा तुळशीदास पारधी, पोना महेंद्र कटरे, पोशि प्रशांत गौतम यांनी केली.


