मोटारसायकल चोरणार्या दोन चोरट्यास मुद्देमालासह गोरेगाव पोलिसांनी केली अटक….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोरेगाव(गोंदिया) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक, गोंदिया अशोक  बनकर, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी  किशोर पर्वते, यांनी गोंदिया जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करून गुन्हे उघडकिस आणण्या बाबत आदेशित करून निर्देश सूचना दिल्या होत्या  त्या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेश, निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली गोंदिया गोंदिया जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचा पोलिस ठाणे स्तरावर शोध मोहीम हाती घेवून गुन्हेगारांना जेरबंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे.त्यानुसार पोलीस पोलिस निरीक्षक  अजय भुसारी, यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन गोरेगाव येथील पोलिस पथक हे पो.स्टे. गोरेगाव अपराध क्रमांक 517/23 भादवी कलम 379 मधील गुन्ह्याचे तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार
*(1) प्रशांत राजकुमार सयाम वय 19 वर्षे राहणार बिरडीटोला तालुका सडक अर्जुनी जि. गोंदिया* हा चोरीच्या गुन्ह्यातील हिरो एचएफ डीलक्स मोटर सायकल मौजे चूलोद येथे विकणार असल्याची गुप्त बातमीदार बाबत माहिती मिळाली. तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीस गेलेली एचएफ डीलक्स

1) मोटरसायकल एम एच 35 एक्स 5240 ही मिळून आली. तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता





2) दुसरी मोटर सायकल यामाहा कंपनीची एफ झेड फाईव मोटर सायकल नंबर नसलेली व



3) हिरो स्प्लेंडर प्रो मोटरसायकल नंबर नसलेली मिळून आली. आरोपीने गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले इतर *साथीदार आरोपी नामे–*
*(2) साहिल उमेंन्द्र बिसेन वय 19 वर्षे राहणार बाम्हणी ता. गोरेगाव जि. गोंदिया* याचे नाव सांगितले. त्यावरून आरोपी नंबर दोन याचे राहते गावी जाऊन शोध घेतला असता त्याचे ताब्यातून



4) हिरो होंडा स्प्लेंडर एमएच 35 यु 2174 हे वाहन मिळून आले. तसेच अधिक तपास केले असता मौजा सटवा डव्वा येथुन

5) नंबर नसलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल मिळून आली. *

अश्या एकूण पाच मोटर सायकल ताब्यात घेण्यात आल्या* असून नंबर नसलेल्या मोटर सायकलचे इंजिन व चेसीस नंबर वरून पुढील माहिती घेऊन तपास करीत आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पो. नि. अजय भुसारी, यांचे मार्गदर्शनात स. पो. नी गोसावी स. फौ. राजकुमार पवार, पो. हवा. रमेश पटले, सुनिल वानखेडे, पो.शि. सुरेश राहांगडाले कमलेश गराट, शैलेंद्र बोंदरे, तीरंजीव कुमडे, चाचेरे, निकेश राठोड यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!