
गोंदिया शहरात घरफोडी करणाऱ्यास मध्यप्रदेश येथुन मुद्देमालासह अटक…
गोंदिया- याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, पोलिस ठाणे गोंदिया शहर येथील रहिवाशी तक्रारदार सौ. ममता खटवाणी रा. वाजपेयी वार्ड, सिव्हील लाईन, गोंदिया यांचे घरी दि. 21/08/2023 रोजी फिर्यादी यांनी रस्त्यावर फिरणारा चाबी दुरुस्ती करणारा अनोळखी इसमास आपले राहते घरी लोखंडी आलमारीचे लाँक दुरुस्ती करण्याकरीता घरामध्ये बोलावले असता, सदर अनोळखी इसमाने आलमारीचे लाँक दुरुस्ती करीत असतांना आलमारी मध्ये ठेवलेला एकुण 220 ग्रँम सोन्याचे दागिने चोरुन घेऊन गेला अशा फिर्यादी चे रिपोर्टवरुन पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्रं. 564/2023 कलम 380 भा.द.वी. अन्वये दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेता पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, यांनी, गोंदिया जिल्ह्यामध्ये आलमारीचे लाँक दुरुस्ती करणारे, तसेच चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, जबरी चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देश सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे निर्देशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यात आलमारीचे लाँक दुरुस्ती करणारे, तसेच चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, जबरी चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत होता. तसेच विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
त्यानुसार नमुद गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवून फिर्यादी यांना सविस्तर विचारपुस करून घटनास्थळा जवळील सी. सी.टी.व्ही फुटेज ची पाहणी, आरोपीचे प्राप्त सी. सी. टी. व्ही फुटेज आणि तांत्रीक विष्लेशन करण्यात आले. प्राप्त माहीतीच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती वरून आरोपी हा हॉटेल सेंट्रल पॉईट श्री टॉकीज रोड गोंदीया येथे थांबलेला असल्याबाबद माहीती झाली. तसेच आरोपी हा उधना जि. सुरत, राज्य गुजरात येथील असल्याचे माहीती मिळाल्याने पोलिस पथकास रवाना करण्यात आले. आरोपी नामे गुरुबिर धिरसिंग सिंग वय 31 वर्ष. रा. बापुनगर, उधना, जि. सुरत, राज्य गुजरात यास मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यात कातीया येथे राहत असल्याचे समजल्याने तेथे जावून पोलिस पथकाने त्यास ताब्यात घेतले. सदर शंसयीत अरोपीत इसमास ताब्यात व विश्वासात घेऊन गुन्ह्यासबंधाने विचारपुस केली असता, त्याने ताला दुरुस्तीचे कामाने गोंदिया येथे आल्याचे व दि. 21/08 /2023 रोजी उपरोक्त गुन्हा चोरी केल्याचे कबुल केले.नमूद आरोपींचे ताब्यातुन एक मोबाईल हँडसेट व एकूण 173.5 ग्रॅम पिवळ्या धातूचे दागिने असा एकूण किंमत 11,68,600/- रुपयांचा मुद्देमाल गुन्ह्यात हस्तगत करुन जप्त करण्यात आला आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांचे नेतृत्वात, सपोनि. विजय शिंदे, पोउपनि महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, पोहवा. राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, महेश मेहर, इंद्रजीत बिसेन, चित्तंरजन कोडापे, चेतन पटले, पोशी संतोष केदार, पो.शी. हंसराज भांडारकर, चापोहवा लक्ष्मण बंजार व चापोशी घनश्याम कुंभलवार, तसेच सायबर सेलचे पोहवा. दिक्षीत दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे, यांनी कामगिरी केली आहे. सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे




