
नकली सोने विक्रीच्या वादावरुन झालेल्या खुनाचा गोंदिया पोलिसांनी काही तासात केला उलगडा….
गोंदिया- सवीस्तर व्रुत्त असे की यातील फिर्यादी श्री- संदीप मदनलाल ठकरेले वय 23 वर्ष धंदा- प्लंबर काम रा. हनुमान मंदीरचे मागे, गोंडीटोला, कटंगीकला ता.जि.गोंदिया यांनी दिनांक – 19/09/ 2023 रोजी पोलिस स्टेशन रावणवाडीला येवुन तोंडी तक्रार दिली की, दिनांक 18/09/2023 रोजीचे दुपारी 03/00 वा चे सुमारास तो आपले मोहल्यातील मित्र किशोर चुन्नीलाल राठौर वय 30 वर्ष रा. गोंडीटोला, कटंगी कला ता. जि. गोंदिया व देवदीप राजेन्द्र जैतवार वय ” 18 वर्ष, रा. हनुमान मंदीरचे मागे, गोंडीटोला, कटंगीकला ता.जि.गोंदिया यांचेसह मोटार सायकलने किशोर राठोड याचेकडे असलेला नकली सोन्याचा झुमर विकण्याकरीता गेले असता यातील नमुद आरोपीनी त्याचे मित्रांना मारपीट करुन जबरीने आपले मोटार सायकलवर बसवुन ग्राम डोंगरगाव : (म.प्र) ला शेतात नेवुन ” *हमे नकली सोना बेचकर हमारे पैसे ऐठते हो” हमारे लांखो रुपये नक्ली सोना दे कर लुटे है ! हमारे पैसे वापस् करो !!! असे बोलून* फिर्यादीचे मित्र – देवदीप जैतवार याचेकडुन 5000 /रु जुलमाने घेवुन तिघांना लाकडी काठीने व लाथाबुक्यांने मारपीट करुन मित्र *मृतक नामे* – *किशोर चुन्नीलाल राठौर* यास जीवानिशी ठार केले आहे. अशा फिर्यादीचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन रावणवाडी अप.क्रमांक 281/ 2023 कलम 302, 364, 386, 341, 143, 144, 147, 148, 149, 323, 504, 506 भा.दं. वि.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.उपरोक्त गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सण- उत्सव काळात गोंदिया जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता पोलिस अधीक्षक,. निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक .अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांनी सदरचा गुन्हा करणाऱ्या आरोपीतांचा शोध घेऊन गुन्हेगारांना तात्काळ गून्ह्यात अटक करण्याच्या निर्देश सूचना पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन रावणवाडी तसेच पोलिस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा यांना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने आरोपीतांचे शोध घेवून अटक करण्याकरीता पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे रावणवाडी आणि पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचे मार्गदर्शनात वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक तसेच पोलिस ठाणे रावणवाडी चे पोलिस पथक खून करणाऱ्या आरोपी- गुन्हेगारांचा शोध घेत असताना फिर्यादी यांनी सांगितलेल्या माहितीवरुन आणि गुप्त बातमीदार यांचे कडून प्राप्त माहिती वरुन खून करणाऱ्या आरोपीतांचा वारशिवनी जिल्हा–बालाघाट (म.प्र.) येथे शोध घेवुन आरोपी
1) *ओमप्रकाश खिलेश्वर चौधरी वय 18 वर्षे*
2) *अजय तुरकर वय 35 वर्षे*


3) *शुभम उर्फ राजू दीपचंद ठाकरे वय 23 वर्षे*

4) *अशोक ठाकरे वय 40 वर्षे*

5 *) आलोक बिसेन वय 24 वर्षे* सर्व राहणार- कोसते, तालुका- वाराशिवनी, जिल्हा – बालाघाट (मध्य प्रदेश) यांना कोस्ते जिल्हा बालाघाट येथून ताब्यात घेण्यात आले.आरोपींना गुन्ह्यात विचारपूस करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पाचही आरोपी यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सदर खुना च्या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांच्या आदेश निर्देशान्वये आणि मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक . दिनेश लबडे स्थागुशा, पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात सपोनि.. सरवदे, अम्बुरे, पो.हवा. राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, रियाज शेख, सुमेन्द्र तूरकर तुलसीदास लूटे, इंद्रजीत बिसेन, लक्ष्मण बंजार, संतोष केदार , चापोशी विनोद गौतम यांनी कामगिरी केलेली आहे


