
दिवाळीच्या रात्री शुल्लक कारणावरुन झालेल्या खुनाचा २४ तासाच्या आत रामनगर पोलिसांनी केला उलगडा..
रामनगर(गोंदिया)प्रतिनिधी- याबाबत थोडक्यात माहिती अशी की,दिनांक १२/११/२३ फिर्यादी
राहुल राजु डाहाट वय २४ वर्षे रा. दीनदयाल वार्ड रामनगर गोंदिया


व त्याचा मित्र

अर्पित ऊर्फ बाबु ओमप्रकाश उके वय 24 वर्ष रा. आंबाटोली गोंदिया

असे पालचौक ते गुरुद्वारा रोडने जात असताना चाय शाय बार दुकाना समोर ११,१५ वा. दरम्यान
हर्ष छविंद्र वाघमारे रा. कुडवा गोंदिया
अंकज सोहनलाल राणे ऊर्फ राणा रा. डब्लींग कॉलनी जवळ* गोंदिया
प्रविण सुनिल मुटकुरे रा. रेल्वे स्टेशन समोर, रेलटोली गोंदिया
यांच्या ताब्यातील मोटर सायकल वरुन गुरुद्वारा ते पालचौक या दिशेने येवुन फिर्यादी राहुल दहाट व अर्पित उके याला मोटारसायकलने कट मारुन गेले या कारणावरुण त्यांच्यात वाद झाले. त्यामध्ये अर्पित याला 1)हर्ष 2)अंकज 3) प्रविण या तिघानी संगमत करुन अर्पित उके यावर चाकूने वार करुन जिवे ठार मारले तसेच फिर्यादीला फरशी च्या तुकड्याने मारुन जखमी केले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात आहे . सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा करुन घटना स्थळावरून पसार झाले होते.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलिस अधीक्षक, अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग गोंदिया , सुनिल ताजने, यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस ठाणे रामनगर यांना सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा तात्काळ शोध घेऊन गुन्ह्यात अटक करण्याबाबत सूचना केल्या होत्या.
यावरून सदर गुन्ह्यांचे तपासाच्या अनुषंगाने ठाणेदार केंजळे यांनी मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अधिकारी अंमलदार यांना सूचना केल्या त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अधिकारी अंमलदारानी गोपनिय माहितीच्या आधारे 24 तासाच्या आत गुन्ह्यातील तिन्ही पसार झालेल्या आरोपीचा शोध घेवुन आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे…
सदरची कामगिरी निखील पिंगळे, पोलिस अधिक्षक, गोदिया, अशोक बनकर, अपर पोलिस अधिक्षक, गोदिंया, सुनिल ताजने, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे मार्गदर्शना खाली पोलिस स्टेशन रामनगर चे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे , यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील स. पो. नि. राजु बस्तावडे , पो. हवा. राजेश भुरे,सुनिलसिंह चौव्हाण,जावेद पठाण,छत्रपाल फुलबांधे, आशिष अग्निहोत्री,पो.ना. बाळकृष्ण राऊत,पो. शि. कपील नागपुरे यांनी केलेली आहे….


