अवैधरित्या गोतस्करी करणाऱ्याच्या गंगाझरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गंगाझरी(गोंदीया)- आगामी कालावधीत येणारा गणेशोत्सव व इतर सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या बेकायदेशीर धंदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे यांनी याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते.

या अनुषंगाने  पोलिस अधीक्षक. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी, तिरोडा  प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे गंगाझरी पोलिसांची अवैधरीत्या चालणाऱ्या धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु आहे.त्यानुसार दिनांक 08/09/2023 रोजी पोलिस स्टेशन गंगाझरीचे पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की एका महिंद्रा बोलेरो पिकअप अवैधरित्या गोवंश जनावरांना कोंबून गंगाझरी मार्गे नागपूरकडे नेणार आहेत. त्या आधारे पो. स्टे. गंगाझरी येथील पोलिस गंगाझरी परिसरात गस्त करीत असता, रात्री 02.00 वा. च्या सुमारास गोंदिया कडून तिरोड्याच्या दिशेने जाणारी एक महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच 35 ए जे 0916 ही जीप येताना दिसल्याने पोलिसांनी त्या वाहनाला थांबण्याचा इशारा केला. परंतु जीपच्या चालकाने जीप थांबविली नाही, म्हणून पोलिसांनी त्या जीपचा पाठलाग करून जीपला बरबसपुरा रेल्वे फाटकाजवळ थांबविले, परंतु जीपचा चालक जीप सोडून पळून गेला. पोलिसांनी त्या जीपची पाहणी केली असता, पोलिसांना सदर जीपच्या डाल्यामध्ये एकूण 09 गोवंश जनावरे मिळून आली. त्यातील एक जनावर मयत झालेले आढळून आले. सदरची 09 गोवंश जनावरांची अवैधरीत्या कत्तलीकरीता निर्दयतेने, चाऱ्या पाण्या विना कोंबून बंदिस्त करून वाहतूक करीत असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने पोलिसांनी सदरची जीप व त्यातील 09 गोवंश जनावरे असा एकूण 06,40,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 08 गोवंशीय जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता गौशाळेत दाखल करण्यात आली. सदर प्रकरणी महिंद्रा बोलेरो पिकअप चा चालक यांचेविरुध्द पोलिस ठाणे गंगाझरी येथे अप.क्र. 360/2023 भारतीय दंड विधान कलम 429 सह कलम 11(1),(ड)(इ) प्रा.छ.प्रति.अधि. सह कलम 5, 6, 9 महा. पशु संवर्धन अधि. 1967 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलिस स्टेशन गंगाझरी येथील पोलीस करीत आहेत.





सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी, तिरोडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे, पो.उप.नि. पराग उल्लेवार, स.फौ. मनोहर अंबुले, पो.हवा. भरत पारधी, श्यामकुमार देशपांडे, सुभाष हिवरे, चा.पो.हवा. बघेल, पो.शि. मारबदे, राखडे यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!