
स्थागुशा पथकाचा कळमनुरी हद्दीत मोहादारु निर्मात्यावर छापा,लाखोंचा मुद्देमाल केला नष्ट….
कळमनुरी पोलिस स्टेशन हद्दीतील देवदरी शिवारातील गावठी दारू अड्डा स्थागुशा ने केला उध्वस्त, 800 लिटर रसायन व गावठी दारूसह एक लाखाचा मुद्देमाल केला नष्ट…..
हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाहीची मोहीम हाती घेतली आहे. दिनांक 01 मार्च 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की पोलिस स्टेशन कळमनुरी हद्दीत देवदरी शिवारामध्ये खलील शेख राहणार इंदिरानगर कळमनुरी हा मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी अड्डा चालवतो अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दि.३ रोजी दुपारी देवदरी शिवारात छापा मारला असता तेथे जवळपास 800 लिटर दारूचे रसायन व गावठी हातभट्टी दारू बनवीत असताना दोन इसम नामे


नूर खान हामिद खान पठाण राहणार इंदिरानगर , व

सुनील नारायण आवटे राहणार इंदिरानगर कळमनुरी

असे मिळून आले. हे दोघे शेख खलील याचेसोबत काम करीत होते. पोलिसांनी छापा मारून गावठी हातभट्टी चालक शेख खलील व हातभट्टी वर काम करणारे नूर खान व सुनील आवटे यांच्या विरोध पोलिस स्टेशन कळमनुरी येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसंब घेवारे, पोलिस अंमलदार नितीन गोरे ,राजू ठाकूर, आकाश टापरे, नरेंद्र साळवे ,आजम प्यारेवाले यांच्या पथकाने केली आहे.


