हिंगोली पोलिसांचा अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यावर छापा…
अवैधरित्या प्रतिबंधीत अंमली पदार्थ गांज्याची विक्री करणा-या विरूध्द दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही…
हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक- २७/१२/२०२३ रोजी पोलिस अधीक्षक हिंगोली जी.श्रीधर यांचे आदेशानुसार दहशतवाद विरोधी शाखेचे पथक अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री विरूध्द कार्यवाही करीता हिंगोली शहरात पेट्रोलींग करीत
असतांना पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, शहरातील अंबिका टॉकीज परीसरात इसम नामे –
सचिन नारायण बालगुडे हा अवैधरित्या अंमली पदार्थ गांज्याची विक्री करीत आहे. अशा माहीती वरून दहशतवाद विरोधी शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु आणि त्यांचे पथकाने सर्व कायदेशिर प्रक्रिया करून नमुद इसम नामे सचिन नारायण बालगुडे वय ४० वर्ष रा. गवळीपुरा यास १ किलो ग्रॅम वजन असलेले अंमली पदार्थ प्रतिबंधीत गांजा ज्याची किंमत १५,९६० रू. असेलेले सह ताब्यात घेवुन नमुद सचिन बालगुडे यास विचारपुस करता
त्याने सदरचा गांजा त्याला शहरातील आनंद पाईकराव रा. रिसाला बाजार यांनी विक्रीकरीता दिल्याचे सांगीतले वरून इसम नामे – सचिन नारायण बालगुडे रा. गवळीपुरा व आनंद पाईकराव रा. रिसाला बाजार यांचे विरूध्द सपोनि राजेश मलपिलु यांचे तकारी वरून पोलिस स्टेशन हिंगोली शहर येथे एन.डी.पी.एस. कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलुस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहा पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, धनंजय पुजारी, दिलीप बांगर, शेख शफीयोददीन, शेख रहीम द.वि.शा. यांनी केली.