
विनापरवाना अवैधरित्या रेतीची वाहतुक करणारा हिंगोली गुन्हे शाखेच्या ताब्यात…
अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा हायवा ट्रक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला…,
हिंगोली)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात चालणारे अवैध धंद्याचे समूह उच्चाटन करण्यासंदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना सूचना दिल्या होत्या


त्या अनुषंगाने दि(26) जून 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की नांदेड येथील टिप्पर चालक सुभाष भुजंग जोंधळे वय 45 रा. राहुल नगर वाघाळा याने आपल्या ताब्यातील दहा चाकी हायवा टिप्पर क्रमांक MH21BH 0804 यामध्ये वाहतूक परवाना पावती चे उल्लंघन करून पावतीपेक्षा 2.7 ब्रास अधिकची रेती वाहतूक करून शासनाची फसवणूक करीत आहे अशी माहिती मिळाल्यावरुन सावरखेडा येथे नांदेडहून येणारे टिपर क्रमांक MH 21 BH 0804 यास थांबून खात्री केली असता सदर वाहन चालकाने परवाना पावतीचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक करून रेती वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले यावरून सदर टिप्पर पोलिस स्टेशन बासंबा येथे अधिक कार्यवाही करीता डिटेंड करण्यात आला

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक स्था. गु. शा विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार नितीन गोरे, हरिभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली



