अवैधरित्या गांजा बाळगणार्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…
अवैधरित्या गांजा बाळगुन विक्री करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,गांजासह मुद्देमाल जप्त….
हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धंदयाविरूध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा. पोलिस निरीक्षक
विकास पाटील यांना दिले होते.
त्या अनुषंगाने दिनांक १८/०४/२०२४ रोजी सपोनि राजेश मलपिलु यांचे पथकाला आखाडा बाळापुर पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, नवी आबादी वारंगा
फाटा येथे इसम यादव संभाजी भडंगे हा अवैधरित्या गांजा बाळगुन असुन विक्री करत आहे.
अशी माहिती मिळाल्यावरून स्थागुशा च्या पोलिस पथकाने पंचासह दुपारी ०३.२५ वा दरम्यान मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी नवी आबादी वारंगा फाटा येथे इसम यादव भडंगे यांचे घरी गेले असता नमुद इसम घरी मिळुन आला व पोलीस पथकाला त्याचे ताब्यात विक्री करीता बाळगुन असलेला व शासनाने प्रतिबंधीत केलेला वाळलेला गांजा वजन १.३५ कि.ग्रॅ. किमती ३३,७५०/- रू चा मिळुन आला.
त्यावरून पोस्टे आखाडा बाळापुर येथे नमुद इसमाविरुध्द कलम २०(ब) ii एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे सपोनि राजेश मलपिलु यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजेश मलपिलु,
पोउपनि शिवाजी बॉडले, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, हरीभाऊ गुंजकर यांनी केली आहे.