
विनापरवाना अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणार्यास हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
हिंगोली – आगामी येणाऱ्या सनांच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांचे आदेशाने जिल्हाभर गस्त वाढविण्यात आली त्या अनुषंगाने काल दिनांक ३०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथील पथक पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, पोलिस स्टेशन सेनगाव हद्दीतील सेनगाव जिंतुर जाणा-या मार्गावरील आर. के. हॉटेलसमोर एक इसम स्वत:कडे बेकायदेशीर गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगुन आहे. सदर मिळालेल्या माहितीवरून पोलिस अधीक्षक .जी. श्रीधर व स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक पंडीत कच्छचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे पथकाने नमुद परीसरात जावुन मिळालेल्या गोपनीय माहीती नुसार कार्यवाहीचे नियोजन करून सदर परीसरातुन एक
विशाल ईश्वर चव्हाण वय १९ वर्ष रा. सातोना ता. परतुर जि. जालना यास ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात कमरेला शर्टखाली एक लोखंडी गावठी पिस्टल (अग्णीशस्त्र) जुनी वापरती किंमत १५,००० रू. मिळुन आले. नमुद इसमास गावठी पिस्टलसह ताब्यात घेवुन सपोनि राजेश मलपिलु यांचे तक्रारी.वरून नमुद इसमाविरूध्द पोलिस स्टेशन सेनगाव येथे गुरनं ३३७ / २०२३ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील पोलिस निरीक्षक स्थागुशा . पंडीत कच्छवे यांचे मार्गदशनाखाली सपोनि राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, विठठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, माधव शिंदे, हरीभाउ गुंजकर, तुषार ठाकरे, दिपक पाटील यांनी केली.’




