शेतकऱ्याचे चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचे हेड व ट्रॅाली शोधण्यात अखेर हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेला यश….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

हिंगोली –  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक .१९/०५/२०२१ रोजी तक्रारदार सुभाष सोनटक्के रा. सेनगाव यांचे दुकाना समोर उभे केलेले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर हेड व ट्रॉली किं. अं. ६,४५,०००/-रु चे अज्ञात चोरटयांनी चोरी केल्या बाबत तक्रार दिल्यावरुन पोस्टे सेनगाव येथे गुरनं. १४२/२०२१ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व स्थानिक पोलिस सतत प्रयत्न करत होते. सदरचा गुन्हा उघड करून शेतकऱ्याचा चोरीस गेलेले ट्रॅक्टर हेड व ट्रॉली शोधुन काढणे बाबत हिंगोली पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे  यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश मलपिलु व त्यांच्या पथकाने गोपनीय बातमीदाराकडुन माहीती काढत तपास करत असतांना पथकाला माहिती मिळाली की, नमुद ट्रॅक्टर हेड व ट्रॉली ज्ञानेश्वर पुसराम दवंडे रा. सातोना ता. परतुर जि. जालना याच्या ताब्यात असुन सदरचे ट्रॅक्टर हेड ट्रॉली हे सेनगाव हद्दीतील येलदरी तांडा परीसरात घेवुन आल्याची माहिती मिळाल्यावरुन आज रोजी स्थागुशा चे पथकाने नमुद परीसरात जावुन सापळा रचुन नामे ज्ञानेश्वर पुसराम दवंडे रा. सातोना यास त्याच्या ताब्यात असलेले एक महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर हेड व ट्रॉली सह ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने शेख रहिम उर्फ शेरा शेख चाँद रा.परभणी व ईतर दोन यांचेकडुन दोन वर्षापुर्वी सदर चोरीचे ट्रॅक्टर हेड व ट्रॉली असल्याचे माहित असतांना कमी
किमतीत खरेदी केल्याचे कबुल केले वरुन नमुद इसमाकडुन गुन्हयातील चोरीला गेलेला खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१) एक विना क्रमांकाचे लाल रंगाचे महिंद्रा ५५५ कंपनीचे ट्रॅक्टर हेड जु.वा. किं. अंदाजे ₹ ५५००००/-
२)  एक लाल रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली जु.वा. किं. अंदाजे ₹ ९५०००/-
असा एकुण नमुद गुन्हयात चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल किं.६,४५,०००/- रुपयाचा जप्त करून नमुद मुद्देमाल व ताब्यात घेतलेल्या इसमास पुढील तपास कामी पोस्टे सेनगाव येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही  पोलिस अधीक्षक . जी. श्रीधर अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील पोलिस निरीक्षक स्थागुशा . पंडीत कच्छवे यांचे मार्गदशनाखाली सपोनि राजेश मलपिलु, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, विठठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, माधव शिंदे, हरीभाउ गुंजकर, तुषार ठाकरे, दिपक पाटील यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!