अनाथ मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्तमजुरी

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सोलापूर : अनाथ बालगृहात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच शाळेतील शिक्षकाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. संतोष एकनाथ केदार (वय ३६, रा. जुळे सोलापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या खटल्यात पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती असूनही ती दडवून ठेवल्याबद्दल फिर्यादी असलेल्या वसतिगृह अधीक्षकासह शाळेचे मुख्याध्यापक, अन्य शिक्षक, काळजीवाहक, परिचारिका आणि संस्थेचे सचिव यांनाही आरोपी करण्यात आले होते. आरोपीने स्वतःच्या बचावासाठी जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेच्या अधिक्षकासह मानसशास्त्रज्ञांची साक्ष घेतली होती.

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या अनाथ मतिमंद मुलींच्या एका शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील म्हणजेच गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार घडला होता. महिला संरक्षण आणि सक्षमीकरण संस्थेचे अध्यक्ष तसेच अपंग अत्याचार संरक्षण समितीच्या अध्यक्षांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त यांना लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून संबंधित बालगृहातील मतिमंद मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षकांसह महिला संरक्षण समितीच्या सदस्यासमक्ष पीडित मतिमंद मुलीचा जबाब घेतला होता. यात तिने आपल्याच बालगृहातील शिक्षक संतोष केदार याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती.





त्याप्रमाणे मतिमंद मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षकांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी केदार याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून तपासाअंती न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्यासमोर झाली. यात सरकारतर्फे सहायक सरकारी वकील शीतल डोके यांनी दहा साक्षीदार तपासले. पीडितेची वैद्यकीय तपासणी केलेले वैद्यकीय अधिकारी, पीडिता ही मतिमंद असल्याचा दाखला दिलेले वैद्यकीय अधिकारी, तिच्या वयाचा दाखला देणारे क्ष किरणतज्ज्ञ तसेच पोलीस अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. पीडित मतिमंद मुलगी विद्यार्थिनी असतानाही शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून काळिमा फासल्यामुळे त्यास जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याची मागणी ॲड. डोके यांनी केली. आरोपीतर्फे ॲड. नागराज शिंदे यांनी काम पाहिले.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!