26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश

मुंबई – 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यता दिली.





16 मे रोजीच्या 48 पानांच्या आदेशात, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी सांगितलं की, सुनावणीच्या वेळी युक्तिवादासाठी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे न्यायालयाने पुनरावलोकन केले आणि त्यावर विचार केला. ज्या गुन्ह्यांसाठी त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती करण्यात आली आहे, त्या गुन्ह्यांसाठी 62 वर्षीय राणा प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे, असं न्यायाधीशांनी सांगितलं.



26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. राजनयिक माध्यमांद्वारे त्याला भारतात आणण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यास तयार असल्याचे एनआयएने म्हटले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या 26/11 च्या हल्ल्यातील राणाच्या भूमिकेची एनआयएकडून चौकशी सुरू आहे.



न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, अमेरिकन सरकारच्या वकिलांनी युक्तिवाद केला की राणाला माहित होतं की त्याचा बालपणीचा मित्र, पाकिस्तानी-अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होता. त्यामुळे त्याने हेडली, दहशतवादी संघटना आणि त्याचे सहकारी यांच्या कारवायांमध्ये मदत केली आणि बचावही केला.

दुसरीकडे राणाच्या वकिलाने प्रत्यार्पणाला विरोध केला. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह एकूण 166 जणांचा मृत्यू झाला होता. हे हल्ले 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले होते. मुंबईतील प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले 60 तासांहून अधिक काळ सुरू होते.

भारत आणि अमेरिका यांच्यात प्रत्यार्पण करार आहे. राणाचे भारताकडे प्रत्यार्पण हे पूर्णपणे कराराच्या अधिकार क्षेत्रात होते, असा निकाल न्यायाधीशांनी दिला. या हल्ल्यामध्ये दहशतवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेला होता, त्याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी भारतात फाशी देण्यात आली. या हल्ल्यादरम्यान उर्वरित दहशतवादी भारतीय सुरक्षा दलांनी मारले.

त्या दिवशी नेमकं काय झालं होतं –

26 नोव्हेंबर 2008 ला पाकिस्तानातील 10 दहशतवादी मुंबईत शिरले होते. त्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल आणि नरिमन हाऊस या ठिकाणांना लक्ष्य केले होते. हे सर्वजण पाकिस्तानातील कराची येथून समुद्रमार्गे बोटीने मुंबईला आले होते. येताना त्यांना भारतीय नौदलाला चकमा दिला होता. त्यांनी वाटेत एक भारतीय बोटीचे अपहरण करत त्यावरील सर्वांना ठार केले होते. या बोटीचा वापर करून ते रात्री आठच्या सुमारास कुलाब्याजवळील मासळी मार्केटमध्ये उतरले होते.

26 नोव्हेंबर 2008 हा दिवस कोणताही भारतीय विसरणार नाही. या दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला आता 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही हा दिवस आठवल्यास देशवासियांच्या डोळ्यात पाणी येते. या हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचार्‍यांसह 166 लोक मारले गेले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.

26 नोव्हेंबर 2008 ला पाकिस्तानातील 10 दहशतवादी मुंबईत शिरले होते. त्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल आणि नरिमन हाऊस या ठिकाणांना लक्ष्य केले होते. हे सर्वजण पाकिस्तानातील कराची येथून समुद्रमार्गे बोटीने मुंबईला आले होते. येताना त्यांना भारतीय नौदलाला चकमा दिला होता. त्यांनी वाटेत एक भारतीय बोटीचे अपहरण करत त्यावरील सर्वांना ठार केले होते. या बोटीचा वापर करून ते रात्री आठच्या सुमारास कुलाब्याजवळील मासळी मार्केटमध्ये उतरले होते.

कुलाब्यातून हे दहशतवादी प्रत्येकी 4 जणांच्या गृपने टॅक्सीने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गेले. रात्री 09:30 वाजता दहशतवाद्यांचे एक पथक छत्रपती शिवाजी टर्मिनल रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी प्रत्येकाच्या हातात एके-47 रायफल होत्या आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्लेखोरांमध्ये अजमल कसाबचाही समावेश होता. ज्याला सुरक्षा दलांनी नंतर जिवंत पकडले होते व त्याला फाशी देण्यात आली.

सीएसटी रेल्वे स्थानकावर झालेल्या गोळीबारांनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लगेच विलेपार्ले परिसरात गोळाबार झाला. त्यामुळे पोलीस हतबल झाले. त्यानंतर एनएसजी कमांडोंना पाचारण करण्यात आले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन दिवस ही चकमक सुरू होती. एनएसजी कमांडोंनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचार्‍यांसह 166 लोक मारले गेले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.

26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या या हल्ल्यामागे लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात होता. संघटनेने डेव्हिड हेडली या अमेरिकन आरोपीला नोव्हेंबर 2006 ते एप्रिल 2008 या कालावधीत आठ वेळा मुंबईला रेकी करण्यासाठी पाठवले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली हा कट रचला गेला होता. मुंबई हल्ल्यानंतर काही महिन्यांनी हेडलीला अमेरिकेत अटक करण्यात आली, तेव्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक त्याची चौकशी करण्यासाठी तेथे गेले होते.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!