धक्कादायक! चविष्ट जेवण बनवले नाही म्हणून मुलानेच केली आईची हत्या

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धक्कादायक! चविष्ट जेवण बनवले नाही म्हणून मुलानेच केली आईची हत्या

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एका 55 वर्षीय महिलेला तिच्या मुलासोबत झालेल्या वादात आपला जीव गमवावा लागला आहे. ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील वेळू गावात ही घटना रविवारी (26 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी घडली. आई आणि मुलामध्ये घरगुती वाद वारंवार होत असत. मात्र, ही घटना घडली त्या दिवशी चविष्ट जेवण न दिल्याने संतापलेल्या मुलाने आईच्या गळ्यावर विळ्याने हल्ला केला, ज्यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यावर आपण काय करुन बसलो याची जाणीव झाल्यानंतर आरोपीने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोज घेतला. दरम्यान, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.





पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि त्याच्या आईमध्ये रुचकर जेवणावरुन वाद झाला. आईने रुचकर जेवण बनवले नाही म्हणून आरोपी चिडला होता. आरोपी हा सदर महिलेचा मुलगा आहे. आरोपी आणि आईमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. महिला आणि तिच्या मुलामध्ये घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होत असत. दरम्यान, रविवारी, आरोपीचे त्याच्या आईशी पुन्हा भांडण झाले. त्याने तक्रार केली की तिने त्याला चवदार अन्न शिजवले नाही आणि त्यातूनच वाद सुरु झाला. आरोपीने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली.



आरोपी इतका चिडला होता की, त्याने रागाच्या भरात आपल्या आईच्या मानेवर विळ्याने वार केला. घाव वर्मी लागल्याने ती जागीच कोसळली आणि मरण पावली, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेनंतर आरोपीने झोपेच्या गोळ्यांचे ओव्हरडोज घेतले. नंतर आरोपी मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीच्या आईचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, रुग्णालयात मुलगा शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याला हत्येचे कारण विचारले असता आरोपी म्हणाला, माझी आई मला स्वादिष्ट जेवण देत नाही. याच गोष्टीवरून मी नाराज होतो, रविवारी देखील तिने दिलेले जेवण हे स्वादिष्ट नव्हते. याच गोष्टीवरून मला राग आला आणि आमच्यात भांडणे झाली. या भांडणातून मी विळेने आईवर वार करून तिची हत्या केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!