धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…
WhatsApp Group Join Now
Facebook Like / Share
Instagram Follow
YouTube Like / Subscribe
धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या..
धाराशिव | प्रतिक भोसले – राज्य शासनाच्या गृह विभागाने दि.२० नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करत आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये धाराशिव पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली असून अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून तर कळंबचे सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांची गडचिरोली येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून बदली केली आहे. यामुळे त्यांचा दि.२२नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.